अकोला: खडकी पोलिसांना तीन दिवसांपूर्वी एका ३ वर्षाच्या मुलीचा खून केलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. या गुन्हयाचा तपास करत मुलीच्या आईसह प्रियकरास अटक केली आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने चिमुरडीचा आईनेच प्रियकराच्या मदतीने खून केला.
याप्रकरणी लक्ष्मी संतोष गवई (२६) व संतोष देवमन जामनिक (-२५, दोघे रा. खेरपुडी, ता. बाळापूर, जि. अकोला) यांना अटक केली आहे. दोन मार्च रोजी खडकी रेल्वे स्टेशन ते खडबी बाजार रस्त्यावर सीएफडी मैदानाजवळ तीन वर्षाचा मुलीचा मृतदेह आढळला होता.
रेल्वे प्रवासातच केला मुलीचा खून आरोपी लक्ष्मी व संतोष हे अकोला जिल्ह्यातील एकाच गावचे रहिवासी असून त्यांच्यात अनैतिक संबंध आहेत. गाव सोडून पुण्यास जाण्याचे त्यांनी ठरवले होते व १ मार्च रोजी ते गावातून पुण्यास येण्यासाठी निघाले. परंतु, लक्ष्मीने तिच्या सोबत ३ वर्षाची मुलगी आणल्याने रेल्वे प्रवासात त्यांच्यात भांडणे झाली. आरोपीने मुलीस पट्ट्याने मारहाण करत तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर ते दोघे खडकी रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर त्यांग नी जवळील मोकळ्या मैदानात जाऊन मुलीचा मृतदेह टाकून ते पसार झाले.