पुणे७ऑगस्ट:-पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत येत असलेल्या, मौजेबल मोशी गावात परपुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून, महसूल विभागात तलाठी पदावर असलेल्या पतीने, आपल्या डॉक्टर पत्नीचा खून केल्याच्या घटनेने पुणे शहरात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील वानवडी येथे अल्पवयीन मुलीवर गँगरेप करण्याची घटना ताजी असतांना, दोन वर्षापूर्वी लग्नाच्या पवित्र बंधनात अडकलेल्या,उच्च शिक्षित असलेल्या पतीने, आपल्या डॉक्टर पत्नीचा खून केल्याने,पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात गुन्हेगारीचा आलेख वाढल्याने,पुणे जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मोशीत खून झालेल्या डॉक्टर पत्नीआणि आरोपी पती हे दोघेही विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी असून,दोघेही नोकरी निमित्त पुण्यात आले होते. मृतक डॉक्टर पत्नी आणि तलाठी पती यांनी पुणे नासिक मार्गावर असलेल्या मोशी गावातील युटोपीया सोसायटीत घर विकत घेतले आहे. त्या घराचा गृहाप्रवेशाचा कार्यक्रम४सप्टेंबर रोजी होता, गृहाप्रवेशाच्या कार्यक्रमाला जवळचे आप्तेष्ट आणि मित्र आले होते.तलाठी पतीला त्याच्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध, डॉक्टर पत्नी पुणे येथील नायर रुग्णालयात नोकरीला होती,त्याच रुग्णालयात नोकरी करणाऱ्या एका डॉक्टर सोबत संबंध आहेत, असा संशय असल्याने, पत्नीचा खून करण्याची योजना त्याने आगोदर आखली होती. अखेर तलाठी पती गृह प्रवेशाच्या दिवशी पती आपल्या सोबत असा वागेल असा विचार मनात डॉक्टर पत्नीने मनात विचार सुद्धा केला नसेल.परंतु संशयाचं भूत मनात केलेल्या पतीने घरी आलेल्या पाहुण्यांना निरोप दिल्यावर,पतीने धारधार शस्त्राने पत्नीची हत्त्या केली.५सप्टेंबर रोजी उशिरा पर्यंत घराचे दार उघडले नसल्याने, शेजाऱ्यांना संशय आल्याने,या प्रकाराची माहिती, त्यांनी एमआयडीसी पोलिसांना दिली,त्यावरून पोलीस घटनास्थळी पोहचल्यावर डुप्लिकेट चाविने दरवाजा उघडल्यावर डॉक्टर पत्नी रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत पडली होती.आणि त्याठिकाणी पत्नीचे नायर रुग्णालयातील एका डॉक्टर सोबत विवाहबाह्य संबंध होते,या कारणामुळे पत्नीला ठार केल्याची एक चिठ्ठी मृत डॉक्टर पत्नीच्या शवा जवळ पोलिसांना मिळून आली. त्यावरून भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी, आरोपीला शोधण्यासाठी पोलीस पथक गठीत करून तपासकामी रवाना केली.सीसीटीव्ही फुटेज वरून आरोपी पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथे आढळला, पोलिसांनी वृत्त लिहेपर्यंत आरोपी पतीला अटक केली नव्हती. पत्नीची हत्या करून संसार संपविलेला तलाठी शेवटी पुण्यातील आळेफाट्याला निदर्शनास आला. तेथील त्याच्या घराजवळ त्याने त्याची चारचाकी पार्क केली आणि एक बॅग घेऊन तो निघून गेल्याचं सीसीटीव्हीत दिसून आलं. लवकरच तो पोलिसांच्या हाती लागेल. पण सुशिक्षित ते ही उच्चपदस्थ व्यक्ती असा कायदा हातात घेत असतील तर हे नक्कीच धोक्याचं आहे उच्च शिक्षित दाम्पत्याचा संसार संशयाने मनात घर केल्याने उद्धवस्त झाल्याने समाजमन सून्य झाले आहे