परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ,!राज्यपाल कोशियारी यांनी दिले आदेश! मुबई३१ऑगस्ट:-३०ऑगस्ट रोजी यवतमाळ-वाशिमच्या सेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या ५ संस्थांनावर ईडी च्या धाडसत्राची घटना ताजी असतांना, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी परिवहन मंत्री यांनी पदोन्नती आणि परिवहन अधिकारी यांच्या बदली प्रकरणात कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारी वरून,शिवसेनेचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने चौकशीसाठी बोलावण्याची नोटीस बजावली असतांनाच, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अनिल परब यांचावर केलेल्या घोटाळ्याची चौकशी, लोकायुक्त यांनी करावी असे आदेश, आज दिले आहेत. त्यामुळे शिवसेनेचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.मनी लॅन्डरिंग संचालयाने सचिन वाझे १००कोटी रुपये वसुली प्रकरणात,ईडीच्या हाती काही संशयास्पद दस्ताऐवज लागल्याने ३१ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली होती.अशातच किरीट सोमय्या आणि गजेंद्र पाटील यांनी दाखल केलेल्या चौकशीची दखल राज्यपाल कोश्यारी यांनी घेत,नवीन लोकायुक्त मार्फत २ सप्टेंबर पासून चौकशी करण्याचे आदेश दिल्याने, मुख्यमंत्री ठाकरे यांची डोकेदुखी वाढली आहे.शिवाय परिवहन मंत्री परब यांच्या मर्जीतील परिवहन अधिकारी यांच्या घरावर ईडीने धाड टाकली असून,या धाडीत ईडीच्या हाती काही महत्त्वपूर्ण दस्ताऐवज हाती लागले असून, ईडीने त्या संदर्भात खुलासा केला नसल्याने,ईडीच्या हाती कोणते धागेदोरे लागले,ते अजून गुलदस्त्यात आहे. किरीट सोमय्या यांनी चार महिन्यांपूर्वी लोकायुक्त कडे तक्रार केली होती असे एका वृत्त वाहिनीशी बोलताना स्पष्ट केलं आहे.नागपूर ग्रामीण परिवार विभागात उपविभागीय परिवहन अधिकारी पदी असलेल्या बजरंग खरमाटेच्या निवासावर आणि काही ठिकाणी ईडीने छापे टाकले. त्यामुळे महाराष्ट्रभरात खळबळ उडाली. परिवहन खात्यात सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात पहिली तक्रार गजेंद्र पाटील यांनी केली होती. त्यात खरमाटे यांचं देखील नाव होतं.गजेंद्र पाटील यांनी मे महिन्यात तक्रार केली होती. यामध्ये परिवहन विभागात बदल्यांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यांनी नाशिक येथील पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. शिवाय न्यायालयातही धाव घेत याचिका दाखल केली.नाशिक पोलीस आयुक्तांच्या एसआयटीने 80 पेक्षा अधिक अधिकाऱ्यांची चौकशी केली होती. त्यात बजरंग खरमाटे यांचंही नाव होते. नाशिक पोलीस आयुक्त यांनी साडेपाच हजार पानांचा अहवाल पोलीस महासंचालक यांना पाठवला होता. मात्र त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. आता ईडीकडून कारवाई सुरू झाली आहे.बजरंग खरमाटे हे नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन विभागामधील उप परिवहन अधिकारी असून ते परिवहन मंत्री अनिल परब यांचे जवळचे मानले जातात. अनिल परब आणि बजरंग खरमाटे यांनी संगनमताने करोडो रुपये जमवले आणि आपसात वाटून घेतले, असा आरोप भाजप नेते किरिट सोमैय्या यांनी केला होता. त्यांनी दोन-दोन महिन्यांनी अनेक अधिकाऱ्यांची बदली केली आणि 25-30 लाख रुपयांपासून एक कोटी रुपये घेऊन प्रमोशन केले असल्याचेही सोमैय्या यांनी आपल्या आरोपात म्हटले होते.एकीकडे बदलीचा वाद असताना दुसरीकडे परिवहन विभागात एकूण 250 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. महाराष्ट्र परिवहन विभागात घोटाळा झालेल्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश लोकायुक्तांनी दिले आहेत. परिवहन विभागात एकूण 250 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याच आरोप आहे. याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार मिहीर कोटेचा यांनी तक्रार केली होती. याच तक्रारीची दखल घेत लोकायुक्तांनी या कथित घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. परिवहन विभागातील ई तिकिटींगमध्ये 250 कोटी रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे.