अकोला

अतिवृष्टीची मदत शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्याची सरपंच संघटनेची मागणी

मूर्तिजापूर: अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानापोटी शासनाने जाहीर केलेल्या हेक्टरी १३ हजार ६०० रुपयांच्या मदतीपासून या तालुक्यातील शेतकरी अद्याप वंचित असून ही मदत लवकर मिळावी, अशी मागणी करणारे निवेदन येथील तालुका सरपंच संघटनेच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.

सदर निवेदनात असे म्हटले आहे की, समस्त शेतकरी बांधव नापिकीमुळे त्रस्त झालेले आहे. आणि आता समोर शेतजमिनी तयार करणे सुरु आहे. पेरणी करण्याची वेळ समोरच आलेली आहे. नापिकीतून सावरण्यासाठी शासनाने अतिवृष्टीची शासकीय मदत जाहीर केली आहे, परंतु आजही ती शासकीय मदत शेतकर्‍यांच्या बॅक खात्यात जमा झालेली नाही. ती लवकर जमा करावी, अशा मागणीचे निवेदन मुर्तिजापूर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष संतोष गवई, महासचिव विनोद मानकर,उपाध्यक्ष बंडु भाऊ घाटे,माना सरपंच जमील अहमद कुरेशी,हातगाव सरपंच अक्षय राऊत,हिरपूर सरपंच अमोल गढवे,कुरुम सरपंच अतुल वाट,पोही सरपंच किशोर नाईक,दीपक वानखडे,रामेश्वर मुगल,कृष्णा गावंडे,सुमेध अंनभोरे, मुरंबा सरपंच अखिल भटकर,बोर्टा सरपंच पंकज सावळे, वैभव कोरडे,गोपाल बोडें,प्रदीप फुके,पदमा चंद्रमणी वानखडे,गीता सुनील पवार, पूजा आनंद बांगड, विजयाताई सुधाकर पाथरे, कविता सुनील मोहोड यांच्यासह महिला सरपंच तथा सरपंचाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.