ताज्या बातम्या

अतिक्रमण भोवलं ! शिर्ला ग्राम पंचायत सरपंच अपात्र

 

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचा आदेश!

पातुर प्रतिनिधी23 मे : पातूर तालुक्यातील शिर्ला ग्रामपंचायतच्या सरपंच अर्चना सुधाकर शिंदे यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार बाळू उर्फ आनंत बगाडे जिल्हाधिकारी यांच्या कडे केली त्यावरून अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी अर्चना सुधाकर शिंदे यांना सरपंच आणि सदस्य पदावरून अपात्र घोषित केले सविस्तर वृत्त असे आहे की बाळू उर्फ आनंत बगाडे यांनी 22-12-2021 ला शिर्ला ग्रामपंचायत च्या सरपंच अर्चना सुधाकर शिंदे ह्या राहत असलेल्या मालमत्ता तीस-पस्तीस 130 शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे प्रकरण अकोला जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केले होते तर याप्रकरणी शिर्ला ग्रामपंचायतचे सरपंच अर्चना सुधाकर शिंदे यांनी अकोला जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रतिज्ञापत्राद्वारे लेखी जबाब सादर करून त्या शिर्ला येथील मालमत्ता क्रमांक तीस-पस्तीस 130 मध्ये राहत नसून त्यांचे पती सुधाकर डिगंबर शिंदे यांचे मालमत्ता क्रमांक 1421 मध्ये राहतात यावरून अकोला जिल्हाधिकारी यांनी शिर्ला ग्रामपंचायत ग्राम विकास अधिकारी यांना शिर्ला ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ अर्चना सुधाकर शिंदे या मालमत्ता क्रमांक तीस-पस्तीस 130 मध्ये राहतात किंवा मालमत्ता क्रमांक 14 21 मध्ये राहतात याबाबत स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते त्यावरून ग्राम विकास अधिकारी यांनी स्वयंस्पष्ट अहवाल सादर केला ज्यामध्ये शिर्ला ग्रामपंचायतचे सरपंच सौ.अर्चना सुधाकर शिंदे या मालमत्ता क्रमांक तीस-पस्तीस 130 मध्ये राहत नसून त्या मालमत्ता क्रमांक 1421 मध्ये राहतात ज्याचे कायदेशीर क्षेत्रफळ 1089 असून प्रत्यक्ष मोका पाहणी केली असता 52 गुणिले 2258 गुन्हे ला 22 एकूण बाराशे 76 चौरस फूट असल्याचा स्वयंस्पष्ट अहवाल सादर केल्यानंतर शिर्ला ग्रामपंचायत सरपंच अर्चना शिंदे यांनी 187 चौरस फूट शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे नमूद केले त्यावरून शिर्ला ग्रामपंचायत सरपंच सदस्य सौ.अर्चना सुधाकर शिंदे यांना या पदावरून अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी अपात्र घोषित केले आहे