adgaon-khurd
अकोला

अडगाव खुर्द येथे वंचित बहुजन भूमीपुजन आघाडीच्या वतीने विकास कामांचे भूमी पुजन

अकोट : अकोट तालुक्यातील अडगाव खुर्द येथे दिनांक २६ फेब्रुवारी ला सकाळी दहा वाजता दलित दलित सुधार योजने अंतर्गत श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने यशवंत नगर ८ लक्ष रुपये रोड व नाली, आंबेडकर नगर ६ लक्ष रुपये रोड व नाली भीम नगर ५ लाख रुपये रोड. सभागृह ७ लक्ष रुपये, या सर्व कामाचे भूमिपूजन जि. प.सदस्य सरकटे यांच्या अथक प्रयत्नाने नवीन रस्ते व नाली तसेच सभाग्रहाचे भूमिपूजन करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.

तरी वंचित बहुजन आघाडी चे तालुका व सर्कल चे आजी माजी पदाधिकारी तसेच कार्यक्रम चे भुमिपुजन जि.प. सदस्य सुष्मिता सरकटे, सरपंच सुनिता सोनोने, उपसरपंच अनिता गवई ग्रामपंचायत सदस्य अमन गवई, वसिम शाह, राधा लायडे, जिल्हा वंचित युवा आघाडी चे महासचिव राजकुमार दामोधर, समिर पठान युवक तालुका अध्यक्ष मयुर सपकाळ, माजी शहर अध्यक्ष सुभाष तेलगोटे जेष्ठ नेते शिध्येश्वर बेराड, माजी शहर उपाध्यक्ष सदानंद तेलगोटे, शहर अध्यक्ष रामकृष्ण मिसाळ उपाध्यक्ष लखन इंगळे इम्रान खान पठाण, तसेच गावातील पंचमंडल, दयाराम गवई, दादाराव गवई, श्रिराम सुभेदार मनोहर गवई, शेषराव गवई, भावराव गवई, आनंद गवई, पांडुरंग भिसे, प्रमोद सोनोने, महेंन्द्र गवई, आकाश गवई, नितिन गवई, कुमार गवई असंख्य नागरिक उपस्थित होते.