अकोला प्रतिनिधी३०ऑगस्ट:-अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतुन दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्यास, खदान पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने,३०ऑगस्ट रोजी अटक केली. अभिषेक शेषराव अवचार, वय१९वर्षे, रा.कृषी नगर अकोला, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नांव आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कौलखेड गजानन महाराज मंदिरा जवळुन२८ऑगस्ट२०२१ रोजी एम.एच.३०-ए.वाय.७९६८ ही गाडी चोरीला गेली होती. त्यावरून खदान पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक९५५/२१ कलम३७९नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमूद दुचाकी ही न्यू भीमनगर(कृषी)नगर येथील१९वर्षीय रहिवासी अभिषेक शेषराव अवचार याने चोरून नेल्याचे गुप्त माहिती खदान ठाण्याच्या डीबी पथकाला मिळाली,त्यावरून अभिषेकला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता,त्याने नमूद दुचाकी सह एम.एच.३०-यु-३८४४ या क्रमांकाची दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली, त्याच्या कडून दोनही दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, त्याची अंदाजे किंमत४० हजार रुपये इतकी आहे.या चोरट्याने आणखी किती चोऱ्या केल्या आहेत. याचा शोध खदान पोलीस करीत आहेत. ही कारवाई खदान पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्रीरंग सनस यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे.,पोलीस उपनिरीक्षक भगवान पाटील, हे.कॉ.सदाशिव मार्गे,एनपी सी राजेश वानखडे,धीरज वानखडे, इमाम चौधरी, श्रीकृष्ण भारती यांनी केली.