क्राईम

अट्टल दुचाकी चोरट्याला अटक! स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई!

अकोला प्रतिनिधी११डिसेंबर :- अकोला शहरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांत वाढ झाली होती. त्या अनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख संतोष महल्ले यांना, दुचाकी चोरीच्या घटनेचा तपास त्वरित लावण्याचे आदेशीत केले होते, त्यावरून अकोला गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे जुने शहर अकोला येथील शिवसेना वसाहतीत राहणाऱ्या रुपेश रामलाल शाहू, वय ३०वर्षे याला चौकशी साठी ताब्यात  घेऊन त्याची कसून चौकशी  केली असता,त्याने सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २दुचाकी, खदान  पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २ दुचाकी, सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २ दुचाकी तर रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १ दुचाकी अशा प्रकारे एकूण ७दुचाकी चोरून नेल्याची कबुली दिली.नमूद आरोपी कडून सातही दुचाकी जप्त करण्यात आल्या असून,त्याची एकूण अंदाजे किंमत  ५लाख ६०हजार रुपये इतकी आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघड केलेल्या मोटर सायकल चोरीच्या घटनेने अकोला शहरातील रामदास पेठ,खदान,सिटी कोतवाली आणि सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एकूण सात गुन्ह्याची उकल झाली. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या आदेशानुसार अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली  साह्ययक पोलीस निरीक्षक महेश गावंडे,पो. हे.कॉ. प्रमोद डोईफोडे,पो. हे.कॉ. नितिन ठाकरे,पो. कॉ. शंकर डाबेराव,मनोज नागमते,मोहम्मद अमीर,रोशन पटले, गणेश सोनोने, सतीश गुप्ता सुशील खंडारे यांनी केली.