क्राईम

अटकेच्या भीतीने परमवीर सिंह देशातून पलायन?एनआयए ला  संशय!

मुंबई३० सप्टेंबर:-राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर असलेले ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंह हे त्यांना अटक होण्याची भीती असल्याने, त्यांनी देशातून पलायन केल्याचा संशय राष्ट्रीय तपास यंत्रणेला आला आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अंटेलिया निवासाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कार्पिओ गाडी आणि उद्योगपती मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएने परमवीर सिंह यांना अनेकदा चौकशी कामी बोलावून ते चौकशीसाठी सतत गैरहजर राहत आहेत.त्याचप्रमाणे चांदीवाल अहवालाबाबत संमस बजावल्यावरही सिंह जबाब नोंदविण्यासाठी हजर राहिले नसल्याने, एनआयएने सिंह यांचा शोध घेण्यासाठी, वेगवेगळे पथक गठीत करून छत्तीसगड, पंजाब मधील रोहतक मध्ये पाठवून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु, एन आय ए च्या पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर परमवीर यांना शोधण्यासाठी एक विशेष टीम नियुक्त केली आहे.राष्ट्रीय तपास यंत्रणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन वाजेला अटक करण्यात आल्यावर,अंटेलिया प्रकरणाबाबत एप्रिल महिन्यात एन आय ए च्या  मुंबईतील मलबार हिल येथील कार्यलयात परमवीर सिंह हजर झाले होते,त्यावेळी एन आय ए ने त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करीत,त्यांच्यावर अँटिलियाची घटना उघडकीस आली तेव्हा तपास वाजेकडेच का दिला? तसेच वाजे थेट तुम्हालाच का रिपोर्ट करायचा? या सारख्या असंख्य प्रश्नांचा परमबीर सिंह यांच्यावर भडिमार करण्यात आला होता.दररोज या प्रकरणातून नवनवीन खुलासे समोर येत होते. मात्र एनआयएने या प्रकरणात आरोपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात असे अनेक पुरावे एनआयएला मिळून आले आहेत. ज्यात परमबिर सिंह यांचा या प्रकरणात संबध असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे परमबीर सिंह यांच्यावर अटकेची भिती व्यक्त केली जात आहे. या भितीपोटीच परमबीर सिंह यांनी देशातून पलायन केल्याचं बोललं जात आहे.दररोज या प्रकरणातून नवनवीन खुलासे समोर येत होते. मात्र एनआयएने या प्रकरणात आरोपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात असे अनेक पुरावे एनआयएला मिळून आले आहेत. ज्यात परमबिर सिंह यांचा या प्रकरणात संबध असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे परमबीर सिंह यांच्यावर अटकेची भिती व्यक्त केली जात आहे. या भितीपोटीच परमबीर सिंह यांनी देशातून पलायन केल्याचं बोललं जात आहे.विशेष बाब म्हणजे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी, गृहविभागाला अहवालही सादर केला आहे. यावर गृहविभागाकडून संबंधित अधिकाऱ्यांच्या सहभागाच्या पुराव्याबाबत माहिती मागविण्यात आली असून त्यानंतर या सर्व पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. अटकेची टांगती तलवार आणि निलंबनाच्या कारवाईमुळे परमबीर सिंह यांनी देश सोडल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.