बारामती, ५ नोव्हेंबर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दोन नोकरांना आणि चालकाला कोरोनाची लागण झाल्याने, ते बारामतीत दिवाळीच्या सणात सहभागी होणार नाहीत अशी माहिती समोर येत आहे.दिवाळीच्या सणात बारामतीत देखील वेगळा उत्साह असतो.
दिवाळीच्यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे बारामतीमध्ये पवार कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. शरद पवार यांच्या बारामती येथील माळेगाव येथील आप्पासाहेब पवार सभागृहात दिवाळी भेट कार्यक्रमास कार्यकर्त्यांची मोठी झुंबड उडाली होती.
पण या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती होती. त्यामुळे ते नेमके कुठं आहेत आणि का आले नाहीत, याबाबत उपस्थितांमध्ये चर्चा रंगली होती. मात्र खुद्द शरद पवारांनीच अजित दादांच्या अनुपस्थितीबाबत स्पष्टीकरण दिलं.
अजित पवारांच्या घरातील ३ कर्मचारी करोना बाधित तर २ ड्रायव्हर करोना बाधित झाले आहेत त्यामुळे अजित पवार उपस्थित राहू शकले नाहीत, असं शरद पवार यांनी सांगितलं.उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कदाचित करोनाची लागण झाली असण्याची शक्यता आहे.
अद्याप त्यांचा करोना अहवाल आलेला नाही. आम्ही त्याच प्रतीक्षेत आहोत. खबरदारी म्हणून अजितदादा बारामतीतील कार्यक्रमात आज सहभागी झाले नाहीत.
त्यांच्या घरातील दोन कामगार व गाडीचा चालक यांना देखील कोरोना झाल्यामुळे कोणताही धोका नको म्हणून ते आजच्या कार्यक्रमात सहभागी झाली नाही. येथे बरीच गर्दी असणार त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी त्यांनी येऊ नये. असे आम्ही त्यांना सांगितले.’ अशी माहिती शरद पवार यांनी दिली.