अकोला: अग्रवाल महिला मंडळाच्या वतीने अग्रसेन भवनात रंगारंग फागुण उत्सव संपन्न झाला.मंडळाच्या अध्यक्षा कृष्णा पाड़िया यांच्या अध्यक्षतेत संपन्न या होळी उत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी सतगुरु भजन मंडळाने रंग बिरंगी मनमोहक भजने सादर करीत फुलांची होळी साकार केली.
उत्सवात कृष्ण रास रचून गुलाल उधळत महिलांनी जल्लोष करीत बिहारी लालचा जयघोष सादर केला.महिला मंडळ द्वारा कान्हा श्रृंगार व नौका विहार करीत आरती केली. अंत ड्राईप्रâूटचा प्रसाद वितरित केला. प्रसाद अंजू अग्रवाल यांच्या वतीने देण्यात आला.तर महिला मंडळाच्या वतीने कुल्फी वितरित करण्यात आली.
या होळी उत्सवाला सफल करण्यसाठी चंदा अग्रवाल, अंजू अग्रवाल, मनीषा पाडीया, अनीता मुरारका,प्रेमा गुप्ता,सुनीता सोनालावाला, कोषाध्यक्ष वंदना अग्रवाल आदींनी सहकार्य केले.अध्यक्षा कृष्णा पाड़िया व सचिव संतोष केडिया यांनी सतगुरु परिवारास धन्यवाद दिले.