विदर्भ

अखेर विदर्भ वाईन शॉपला सील!जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आदेश!

अकोला : अकोला शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या, गांधी चौकातील विदर्भ वाईन शॉपला, सील करण्याचे आदेश, अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी१७सप्टेंबरम रोजी दिले.

या प्रकरणातील थोडक्यात हकीकत अशी आहे की, दर्यापूर  येथील रहिवासी अमित पुरुषोत्तम गावंडे,यांचे वडिल मयत पुरुषोत्तम तुळशीराम गावंडे यांना महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग मुंबई यांनी, देशी विदेशी दारू विक्रीचा परवाना(अनुज्ञप्ती) सन१९७३-७४ साली दिला होता.

त्यानंतर पुरुषोत्तम उत्तम गावंडे यांनी या  देशी विदेशी दारू विक्री दुकानाच्या भागीदारी मध्ये,अकोल्यातील ब्रिजकीशोर जयस्वाल यांना घेतले होते.त्यानंतर ब्रिजकीशोर जयस्वाल यांचा१९८७ साली मृत्यू झाला.

ब्रिजकीशोर जयस्वाल यांचा मृत्यूझाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परिपत्रकानुसार भागीदाराचा मृत्यू झाल्यावर, ब्रिजकीशोर वल्लभजी जयस्वाल यांची भागीदारी संपुष्टात आली, त्यानंतर ब्रिजकीशोर जयस्वाल यांचे पुत्र राजेंद्र जयस्वाल यांना भागीदार म्हणून दाखविण्यात आले.

त्यानंतर मूळ परवानाधारक पुरुषोत्तम तुळशीराम गावंडे यांचा सन २०००रोजी मृत्यू झाला.तेव्हा या देशी विदेशी दारूच्या परवान्यातील भागीदार राजेंद्र ब्रिजकीशोर जयस्वाल यांनी मूळ परवाना पुरुषोत्तम तुळशीराम गावंडे,यांचे एकमेव वारस असलेले अमित पुरुषोत्तम गावंडे यांना अंधारात ठेऊन, नमूद परवान्यावर मूळ परवानाधारक पुरुषोत्तम तुळशीराम गावंडे यांच्या वारसाचे नांव वगळून,स्वतःचे नांव चढविण्यासाठी राजेंद्र ब्रिजकीशोर जयस्वाल यांनी३०/१०/२०१८रोजी राज्य उत्पादन शुल्क विभाग अकोला येथे अर्ज दाखल केला.

त्यानंतर मात्र उत्पादन शुल्क विभागाचे तत्कालीन अधीक्षक राजेश कावळे यांनी, अमित गावंडे यांना, त्यांचे मत मांडण्यासाठी नोटीस बजावली,हा सर्व प्रकार अमित गावंडे यांच्या लक्षात आल्यावर,त्यांनी अकोला जिल्हाधिकारी यांच्याकडे न्यायासाठी रितसर लढा सुरू केला.

तीन वर्षाच्या लढाईनंतर १७सप्टेंबर२०२१ रोजी राजेंद्र ब्रिजकीशोर जयस्वाल आणि अमित पुरुषोत्तम गावंडे यांची बाजू ऐकुन,मे.विदर्भ वाईन शॉप, एफ.एल-2,संलग्न सी.एल/एफ.एल/टीओडी-3 अनुज्ञप्ती क्रं.19 चे भागीदार राजेंद्र ब्रिजकीशीर जयस्वाल आणि पुरुषोत्तम तुळशीराम गावंडे हे दि.१२/०२/२००० रोजी मयत झाले असून, त्यांच्या वारसाचे नांव मा. आयुक्त राज्य उत्पादन शुल्क मुंबई, यांचे पत्र क्रं एफएलआर/१२९२/२६५७७/ सात, मुंबई दि.१८ऑगस्ट१९९४ व सहसचिव गृहविभाग, महाराष्ट्र शासन यांचे पत्र क्रं बीपीए/२०८९/पीआरओ-२ दिनांक०६/०७/१९८९ च्या परिपत्रकाच्या आधारावर राजेंद्र जयस्वाल यांनी सन१९८७ साली झालेल्या कारारनाम्यानुसार भागीदारी मध्ये पुरुषोत्तम गावंडे यांच्या वारसाचे नांव सदर परवाना स्वतःच्या नांवावर करण्यासाठी३१/१०/२०१८ रोजी अर्ज सादर केला,

त्यावरून राजेंद्र जयस्वाल यांचा भागीदारच्या वारसाचे हक्क हडपण्याचा हेतूअसल्याचे आदेशात नमूद केले तसेच विदर्भ वाईन शॉपचा परवान्याचे नूतनीकरण करु नये,असे उत्पादन शुल्क विभागाला सांगून आजच्या आज दुकान सील करून बंद करण्याचे आदेश दिले.