क्राईम

अखेर फरार लाचखोर वैशाली झनकर यांना अटक!

  1. नासिक न्यूज डेस्क:-१३ऑगस्ट ८लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकारणी आरोपी असलेल्या नासिक जिल्ह्या परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर(वीर) असलेल्या फरार वैशाली झनकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.याबाबत थोडक्यात हकीकत अशी आहे की,नासिक जिल्ह्या परिषदेच्या समोर ९ऑगस्ट रोजी वैशाली झनकर यांच्या चालकाला८लाख रुपयांची लाच घेतांंना रंगेहाथ अटक केली होती. ही लाच त्याने वैशाली झनकर यांच्या सांगण्यावरून घेण्यात आली होती,ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात समोर आल्याने,वैशाली झनकर यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आले होते. न्यायालयाच्या एका आदेशानुसार सायंकाळी महिलेला अटक करण्यात येत नसल्याने, त्यांच्या दोन नातेवाईकांकडून झनकर यांना तपास कामी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात देऊ असे हमीपत्र लिहून घेण्यात आले होते. परंतु झनकर ह्या बुधवारी न्यायालयात हजर न होता फरार झाल्या होत्या.त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वैशाली झनकर यांना अटक करण्यासाठी तपास पथके गठीत करून, मोठ्या शिताफीने झनकर यांना अटक करण्यात आली. त्यांना आज(शुक्रवारी)न्यायालयात हजर करण्यात येणार आहे