अकोला : जुनी निवृत्ती योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी व निमसरकारी कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपाअंतर्गत सोमवारी थाळी नाद आंदोलन करण्यात आले. कर्मचारी संघटनांनी २० मार्चपासून लक्षवेध सप्ताह सुरु झाला आहे.
राज्य शासकीय सेवेत १ नोव्हेंबर २००५ नंतर दाखल अधिकारी, कर्मचार्यांना जुनी निवृत्तिवेतन योजना लागू न करता नवीन अंशदायी योजना लागू करण्यात आली आहे. ही नवी योजना रद्द करून सरसकट सर्व अधिकारी, कर्मचार्यांना जुनीच निवृत्तिवेतन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्य सरकारी संघटनांनी १४ कर्मचारी मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे.
सरकारी, निमसरकारी, शिक्षक शिक्षकेतर, महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा, नगर पंचायती कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी काही मागण्या प्रलंबित आहेत. याबाबत मध्यवर्ती संघटना व इतर संघटनांतर्फे शासनाशी चर्चा करण्यात आली. त्यांना निवेदने सादर करण्यात आली. मात्र मागण्यांना आजपर्यंत वाटाण्याच्या अक्षताच लावण्यात आल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.