अकोला

अकोल्यात शांततेत साजरी करण्यात आली शब-ए-बरात

अकोला : शब-ए-बरात पूजा पठण आणि पवीत्र रात्र आहे. या दिवशी खऱ्या मनाने अल्लाहची उपासना केली जाते. या सोबतच तीलावत म्हणजेच कुरानातील श्लोक वाचले किंवा ऐकले जातात आणि सखावत म्हणजेच दानही केले जाते. शब-ए-बरात मुस्लिममासाठी पवित्र रात्र आहे.

शब-ए-बरातच्या दिवशी मस्जिद आणि कब्रस्तान खास सजवले जातात. लोक रात्री उशिरापर्यंत स्मशानभूमी पूर्वजांना प्रार्थना करतात आणि त्यांच्या पापाची क्षमा मागतात. इस्लाम मध्ये शब-ए-बरातला विशेष महत्त्व आहे. स्थानिक आकोट फाईल येथे शब-ए-बरात निमित्त मुस्लिम कब्रस्तान व इदगाह ट्रस्ट अकोट फैल अकोलाच्या वतीने याही वर्षी शब-ए-बरातसाठी ट्रस्ट ने संपूर्ण कब्रस्तान मध्ये स्वच्छता केली, लाईटची व्यवस्था व पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

कब्रस्तान मध्ये आलेल्या नागरिकांनी सर्वप्रथम येथील मस्जिद मध्ये नमाज पठण केले व मृत्यू पावलेले आई वडील व पूर्वज ? याची आठवण काढण्यात येते व जेथे कबर असते त्या ठिकाणी हार फुल टाकून दर्शन घेण्यात येते.मुस्लिम कब्रस्तान व इदगाह ट्रस्टचे पदाधिकारी यांच्याकडून दरवर्षी चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केले जाते. त्यामुळे या परिसरातील नागरिकाकडून त्यांचा मनापासून सन्मान होतो.

यावेळेस अकोट फाईल येथील पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी यांचा बंदोबस्त देखील असतो. चांगली व्यवस्था ट्रस्ट करीत आहे त्यामुळे मनपा प्रशासन व पोलीस प्रशासन नागरिक यांच्या कार्याची प्रशंसा करत आहे. यावेळी एस. डी. पी. ओ सुभाष दुधगांवकर यांनी शब-ए-बरात निमित्त अकोट फाईल नायगाव येथील मुस्लिम कब्रस्तानला व ईदगाह ट्रस्टला

भेट दिली. ट्रस्टच्या वतीने एस. डी. पी. ओ सुभाष दुधगांवकर यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी नायगाव आकोट फाईल येथील मुस्लिम कब्रस्तान व इदगाह ट्रस्टचे अध्यक्ष शेख बशीर शेख गफ्फार, उपाध्यक्ष जियाउल्ला खान रहीम खान, सचिव अब्दुल मुनाफ, कोषाध्यक्ष अमानउल्ला खान, सहसचिव अब्दुल कादर, सल्लागार मो. कमाल सिद्दिकी, शेख आरीफ, अब्दुल जहीर, शेख शरीफ, शेख रफिक, सलीम खान, फिरोज खान, अजमतउल्ला खान, शेख अकबर, शेख साजिद कुरेशी, यांनी सहकार्य केले.