क्राईम

अकोल्यातील पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या 

अकोला23 मे – अमरावती परिक्षेत्रात पोलिसांच्या आत्महत्येचे सत्र सुरू असून, अमरावती जिल्ह्यातील पोलिस कर्मचाऱ्याची घटना ताजी असताना, आज अकोला पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अकोला पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी आणि दक्षता नगर पोलीस वसाहत परिसरात राहणारे पोलिस कर्मचारी संजय सोळंके ब. न. ८२२ यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २३ मे रोजी  सकाळी समोर आली आहे. या घटनेमुळे अकोला पोलीस विभाग आणि दक्षता नगर पोलीस वसाहत मध्ये खळबळ उडाली आहे.  वरिष्टांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे कारण त्यांनी लिहून  ठेवलेल्या  सुसाईड नोट्समधे ठाणेदार व पोलीस दलातील बाबू जबाबदार आहे, असे लिहले असल्याचे कळते.आज सोमवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास खदान पोलिस कर्मचाऱ्यांना निंबाच्या झाडाला आपल्या परिसरातील कर्मचाऱ्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. घटनेची माहिती पोलिसांनी आपल्या वरिष्ठांना लगेच दिली.संजय सोळंके पोलीस वसाहतीमध्ये राहणारे असून,  ते पोलिस मुख्यालयात  होते.आत्महत्या करते वेळी त्यांचे वय  ४७ वर्षे होते.त्यांच्या अंगावर निळ्या चौकडा असलेला सदरा परिधान केला असल्याची नोंद पंचनामा करताना पोलीसांनी घेतली आहे.
या घटनेची माहिती संपूर्ण पोलीस वसाहत मध्ये वाऱ्यासारखी पसरून, सर्व कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. खदान पोलिस स्टेशन कर्मचारी यांनी पंचनामा केला असून, पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.