अकोला प्रतिनिधी२६सप्टेंबर:-अकोला शहर आणि संपूर्ण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी आणि गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याच्या दृष्टीने अकोला शहरातील 7 गुंडांवर मोक्का कायद्याखाली कारवाई करण्यात आली.अकोला शहरातील आणि संपूर्ण जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय असल्याचे दिसून येत आहे. सुरेश सुहास वाकोडे,वय 35वर्षे,ऋतिक सुधीर बोरकर,वय 20 वर्षे,नरेश राजू कथले,वय 25 वर्षे,राहुल नामदेव मस्के वय 21 वर्षे, विशाल उर्फ सोनू सुनील मंदिरेकर वय 21 वर्षे,विशाल महादेव हिरोळे वय 22 वर्षे, आणि दर्शन रामानंद नंदगवळी वय 23 वर्षे सर्व रा.अकोला अशी 26 सप्टेंबर 2022 रोजी मकोका कायद्याखाली कारवाई करून अटक करण्यात आलेल्या आरोपींची नांवे आहेत.पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार थोडक्यात हकीकत अशी आहे की,सुरेश सुहास वाकोडे वय 25 वर्षे याच्या नेतृत्वाखाली यातील नमूद सहा आरोपी गुन्हे करीत असल्याचे पोलिसांच्या वतीने त्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बातमी मध्ये नमूद असलेला सुहास वाकोडे हा तो राहत असलेल्या भागात आपलं वर्चस्व आणि दहशत निर्माण करण्यासाठी मागील काही वर्षापासून नमूद आरोपींना हाताशी धरून गुन्हे घडवून आणीत होता.तसेच नमूद आरोपींना संघटीत गुन्हे करण्याची सवय लागली होती, हे मागील दहा वर्षापासून केलेल्या गुन्ह्यांवरून पोलीस रेकॉर्ड नुसार स्पष्ट करण्यात आले आहे. नमूद आरोपींविरोधात खून करणे,खुनाचा प्रयत्न करणे,जबरी चोऱ्या टोळीने केल्याचे पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.याच आरोपींवर पोलीस स्टेशन सिव्हिल लाईनच्या हद्दीत अपराध क्रमांक 357/2022 कलम 302,120ब,143,201,34 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमूद आरोपींनी संघटीत पणे केलेला हा गुन्हा आणि यापूर्वी सुद्धा संघटीतपणे केलेल्या गुन्ह्याची दखल घेत अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी नमूद आरोपींचा मकोका कायद्यांतर्गत कारवाईचा प्रस्ताव अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्याकडे सादर केला होता. पोलीस उपमहानिरीक्षक मीना यांनी त्यांच्या स्रोत द्वारे माहिती गोळा करून,संपूर्ण प्रकरणाची सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार नमूद आरोपींवर करण्यात आलेल्या आरोपांची खात्री पटल्यानंतर, मकोका कायद्याखाली कारवाई करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. ही कारवाई यशस्वी करण्यासाठी अकोला पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, अकोला पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, सिव्हिल लाईन ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास मडावी उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे रीडर भालसिंग ब्राम्हण आणि स्थानिक गुन्हे शाखेचे तसेच सिव्हिल लाईन ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी कामगिरी बजावली.