अकोला

अकोला: रेशन लाभार्थ्यांसह काँग्रेसचे आंदोलन

अकोला : रेशनवरील स्वस्त धान्याचा हक्क सोडावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. दरम्यान याचा विरोध करत आज रेशन लाभार्थ्यांसह काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. गरजू लोकांना लाभ देण्याच्या बहाण्याने सर्वच लोकांकडून रेशन सोडण्यासाठी आवाहन करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रकाश तायडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

त्यामुळे सामान्य नागरिकांचे यामध्ये नुकसान होणार आहे. यामुळे खरे लाभार्थींही रेशन धान्यापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे याला विरोध करीत आज काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.