राजकीय

अकोला पश्चिम मतदार संघाच्या अध्यक्ष पदी नगरसेवक फयाजखान यांची निवड!

प्रतिनिधी१६सप्टेंबर:-अकोला महानगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अकोला कार्यकारणी मध्ये फेर बदल करण्यात आले आहे.अकोला महानगर अध्यक्ष पदाची सूत्र विजय देशमुख यांच्या कडे आल्यावर,राष्ट्रवादी काँग्रेसच्या अकोला पश्चिम विधानसभा अध्यक्ष पदी नगर सेवक फयाज खान अब्दुल्ला खान यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे पत्र मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यलयात १६ सप्टेंबर रोजी त्यांना देण्यात आले आहे. अकोला महानगरपालिका मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा जास्त निवडून आणण्यासाठी, अल्पसंख्याक मुस्लिम मतदार राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर सेवक फयाज खान अब्दुल्ला खान यांची निवड अकोला पश्चिम मतदारसंघाच्या अध्यक्ष पदी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार, अकोला महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांनी, नियुक्ती पत्र देऊन केली.फयाज खान यांच्या निवडीमुळे उच्च शिक्षित आणि स्वच्छ प्रतिमेचा अध्यक्ष अकोला पश्चिम मतदारसंघाला मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्या मध्ये उत्सवाचे वातावरण आहे