अकोला प्रतिनिधी19सप्टेंबर:-अकोला बहुजनवंचित आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रमोदभाऊ देंडवे व जिल्हा महासचिव मिलिंदभाऊ इंगळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना अकोला जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत निवेदन सादर करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदनात असे म्हटले की जिल्ह्यात पावसाच्या आगमनापासून तर आजपर्यंत पावसाने थैमान घातला आहे. संततधार पाऊस, अतिवृष्टी व ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तिबार पेरणी करूनही हाती अपयश आले आहे. ज्या शेतकऱ्यांची पिके काही प्रमाणात वाचवल्या गेली होती तीही सप्टेंबर महिन्यात सुरू असलेल्या पावसामुळे पिवळी पडून सर्वच पिके हि पाण्याखाली बुडालेली आहेत. त्यामुळे अकोला जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करुन जिल्ह्यातील सर्वच मंडळातील शेतकऱ्यांना सर्व पिकांसाठी सरसकट पिकविमा द्यावा तसेच शासन स्तरावरून मिळणाऱ्या मदतीस जिल्हृयातील सर्वना पात्र ठरवावे. शेतकऱ्यांना आज रोजी शासन मदतीची गरज आहे. या ओल्या दुष्काळामुळे पिकांचे झालेले नुकसान पाहुन व शेतीसाठी घेतलेल्या कर्जाला कंटाळून अकोला जिल्ह्यातील अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. शासनाने जर जिल्हातील सर्वच शेतकऱ्यांना जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट सर्वच पाकांना मदत जाहीर केली तर या मदतीचा खुप मोठा आधार शेतकऱ्यांना मिळेल व रोजच्या होणाऱ्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मदत होईल. तरी आपण सदर निवेदनाची दखल घेवून जिल्ह्यातील सर्वच मंडळातील पिकांना सरसकट पिकविमा व शासकीय मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्याल हि अपेक्षाही वंचितच्या वतीने व्यक्त केली. निवेदन देतेवेळी महिला प्रदेश महासचिव सौ. अरूंधतीताई शिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रमोदभाऊ देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंदभाऊ इंगळे, महिला जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ पुष्पाताई इंगळे, जिल्हा महिला महासचिव शोभाताई शेळके, अकोला पुर्व तालुकाध्यक्ष किशोर जामनिक, अकोला पश्चिम तालुकाध्यक्ष देवराव राणे, शरद इंगोले, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ प्रतिभाताई अवचार, अॅड. संतोष राहाटे, विकास सदांशिव, सिध्दार्थ शिरसाट, महिला तालुकाध्यक्ष सौ मंगलाताई शिरसाट, सुशील मोहोळ, मोहन तायडे, संगीताताई खंडारे, मंदाताई वाकोडे, उज्वला गडलिंग, डॉ. अशोक गाडगे, शिलवंत शिरसाट, बाळासाहेब गडलिंग, श्रावण भातखंडे, गणेश शिंदे, धर्मेंद्र दंदी, बंडू सोळंके, विद्याधर खंडारे, रविंद्र खंडारे, धिरज शिरसाट, जितेंद्र खंडारे, देवानंद तायडे, मनोहर बेलोकार, आनंद खंडारे, डॉ. अशोक मेश्राम, उमेश जामणिक, तेजस्विनी बागडे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .