क्राईम

अकोला : गोवंश चोरणारी टोळी गजाआड

अकोला : अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी परिसरातल्या बिहाडमाथा येथे कारमधून गोवंश चोरणाऱ्या टोळीला अटक करण्यात आलीय. गुरेज खान बहादर खान (बैदपुरा अकोला) आणि शेख इफराज शेख शकील (बिहाडमाथा बार्शीटाकळी) अशी या आरोपींची नावे आहेत.

त्यांच्याकडून पोलिसांनी ३५ हजार रुपये रोख, गुन्ह्यात वापरलेली टाटा इंडिका व्हिस्टा कार (क्र. एम.एच. ३१ बी.क्यू. ०३८३) असा एकूण २ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शानाखालील टीमने ही कारवाई केलीय.