अकोट: अकोट शहर स्थानिक शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक युवसैनिकांच्या वतीने शिवसेनेचे माजी आमदार दिवंगत स्व.रामाभाऊ कराळे यांचा ७ वा स्मृतिदिन गजानन नगर परीसर येथे संपन्न झाला.सदर अभिवादन कार्यक्रम प्रसंगी प्रमुख उपस्थित असलेल्या मान्यवरांनी स्व.रामाभाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आपले अभिवादनपर मनोगत व्यक्त करत स्व.रामाभाऊंच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकला.
त्यामध्ये प्रामुख्याने शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे,माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चोखंडे,अतुल म्हैसने,जि.प.सदस्य जगण निचळ,शिवसेना ता.प्रमुख ब्रम्हा पांडे,विक्रम जायले,शिवसेना शहर प्रमुख अमोल पालेकर,श्याम सहगल,चंद्रशेखर बारब्दे,डिगांबर सोळंके,शेंडे,तुषार अढाऊ, प्रशांत जायले,दिलीप मिसळे,माजी उपशहर प्रमुख विजय ढेपे, रंगनाथ मिसळे इ.मान्यवरांनी अभिवादनपर आपले मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाला विक्रम जायले,पिंटू वडतकार,अनिकेत पोतले,धनंजय गावंडे,मुकेश ठोकळ,बंडू सिरसाट,संजय पालखडे,मनिष कराळे,टेकाडे आबा,सिरसाट काका,मानकर काका,रत्नाकर रेळे,प्रफुल आवटे,संजय रेळे,भैय्यासाहेब महल्ले,प्रविण कराळे,दिलीप कराळे,गोकुळ काळे,बजरंग भगत,गणेश कुलट,नितिन गोंडागरे,मिलिंद कराळे,बाळासाहेब नहाटे,प्रकाश मंगवाणी,गोपाल पेढेकर,शुभम परियाल,आयुष्य तिडके,सागर कराळे यांच्यासह सर्वपक्षीय मान्यवर व पदाधिकारी तसेच अकोट शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यासह माजी आमदार दिवंगत स्व.रामाभाऊ कराळे यांच्या स्मृतिदिनी मनीष कराळे मित्र परिवाराच्या वतीने सुद्धा अभिवादन कार्यक्रम अकोट शहरात संपन्न झाला तसेच सदर कार्यक्रम अंतर्गत दिनांक १६ मार्च २०२३ रोजी अकोट शहरात संत श्री.गजानन महाराज मंदिर,गजानन नगर येथे शिवसेनेतर्फे भव्य मोफत रोग निदान शिबिर,रक्तदान शिबीर तथा गरजूंना मोफत औषधे वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.या शिबिराच्या मोठ्या संख्येने लाभ घ्यावा यासाठी अकोट शिवसेनेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.