क्राईम

अकोट शहरात देशी कट्टयासह चार काडतूस जप्त! स्थानीय गुन्हे शाखा अकोला यांची धडक कारवाई एक जण ताब्यात

स्वप्निल सरकटे

अकोट २८ऑगस्ट:-अकोला जिल्ह्यातील,अकोट शहरातील जेतवन नगर भागात स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आशीषदुर्योधन खंडारे वय २८ यांच्याकडून एक देशी कट्यासह ४ जिवंत काडतूस दि २७ ऑगस्ट २०२१ रोजी जप्त केले.जेतवन नगर भागात राहत असलेल्या आशीष दुर्योधन खंडारे लोकांमध्ये दहशत पसरविण्याच्या ऊदेशाने त्याच्याजवळ अग्निशस्त्र बाळगत असल्याची माहितीवरून अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे सागर हटवार यांनी पचासमंक्ष आशीष दुर्योधन खंडारे जेतवन नगर अकोट यांच्या घराची झाडाझडती घेतली असता, एक देशी कट्यासह ४ जिवंत काडतूस एक मॅगझिन असा एकूण २५ हजार रूपायचा मूदेमाल जप्त करून अकोट शहर पोलीस स्टेशनला विविध कलन्मावे गून्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीला अटक केली आहे.सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, सदाशिव सुळकर, नितीन ठाकरे, अब्दुल मजीद, संदीप तवाडे, मो. रफी, एजाज अहमद, विरेन्द्र लाड, नफीस शेख, अणिल राठोड यांनी केली.