Akot-Railway-Station
अकोला

अकोट रेल्वे स्थानकांत मूलभूत सुविधांचा अभाव्

रेल्वे स्थानकावर सर्वत्र अस्वच्छता; परिसरातील पथदिवे बंद

अकोट : अकोट रेल्वे स्थानकावर मूलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. असलेल्या सुविधांचीही दुरवस्था झाली असून प्रवाशांना त्रासदायक प्रवासातून जावे लागत आहे.रेल्वे स्थानक परिसरात बंद पडलेले पथदिवे, अकोला नाक्याहून रेल्वे स्थानकडे जाणारा खडतर मार्ग, या मार्गावरील काटेरी झुडपांचे साम्राज्य, रेल्वे स्थानक परीसरात मद्यपींचा वावर, स्थानकावरील अस्वच्छता, पिण्यायोग्य पाण्याची व्यवस्था आदि सुविधांचा अभाव पहावयास मिळत आहे.

अशातच रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहने पार्क केली जातात. याठिकाणी वीज नसल्याने नेहमीच काळोख असतो. काळोखाचा फायदा घेत हा परिसर मोठया प्रमाणावर मद्यपींचा अड्डा बनत चालला आहे. त्यामुळे प्रवासी महिला वर्गांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे.रेल्वे स्थानकावर सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी आता प्रवासी वर्गाकडून केली जात आहे.

अकोला अकोट रेल्वे सेवा सुरू होण्याआधी रेल्वे परिसरात पथदिव्याचे काम करण्यात आले होते.मात्र आज घडीला या संपूर्ण परिसरात काळोखाचे साम्राज्य दिसून येते. रात्री रेल्वे आल्यानंतर प्रवाशांना अंधारातून चाचपडत जावे लागते. अकोला नाका पासून नरसिंग महाराज झोपडी ते रेल्वे स्थानक हा रस्ता खडतर असून रस्त्यावर नेहमीच अंधार पडलेला असतो. रात्री या अंधारातून जाणे म्हणजे मोठे दिव्यच असते.

रेल्वे स्थानकाच्या मुख्यद्वारा जवळ सुद्धा काटेरी झुडपं वाढलेली असल्याने रात्रीच्या वेळी अनेक जणांना इजा होत आहे.अकोला ते अकोट दररोज तीन रेल्वे गाड्या चालविल्या जातात. ज्यामध्ये हजारो प्रवासी प्रवास करतात.यामधून दक्षिण मध्य रेल्वेला चांगले उत्पन्नही मिळत असल्याचे दिसून येते.

Akot-Railway-Station

रेल्वे सेवेला अकोटवासी भरभरून प्रतिसाद देत आहे.सकाळी,आणि दुपारच्या वेळात आणखी दोन गाड्याची संख्या वाढविण्याची मागणी देखील प्रवासी वर्गातून होत आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद बघता रेल्वे विभागाने देखील तशा सुविधा पुरवणे गरजेचे होते. मात्र नेहमीप्रमाणे अकोटला रेल्वे सावत्र वागणूक देत असल्याचे प्रवासांचा आरोपा वरून दिसुन येते. अनेक नागरिक रात्री उशिरा कामावरून घरी परतत असतात. रात्री फारशी गर्दी नसते. त्यामुळे प्रवाशांसोबत लुटीच्या घटनाही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येऊ शकतो. प्रवाशांचा रेल्वे प्रवास जास्तीत जास्त कसा सुरक्षित होईल, याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. आजही ही गोष्ट कोणीच तेवढ्या गांभीर्याने घेत नाही. एखादी घटना घडल्यानंतर सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत आवश्यक पाऊले उचलण्याविषयी हालचाली सुरू होतात. मात्र, नंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे असते.

पहिले दर्शन बेशिस्तीचेच

रेल्वे स्थानकावर प्रवासी वर्गाकडून प्रवेशद्वारासमोरच वाहने लावली जातात. त्यामुळे बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांना पहिले दर्शन घडते ते या बेशिस्त वाहनांचेच. प्रवाशांचा यातून मार्ग काढतांना त्रागा होतो. बर्‍याच वेळा तर धावपळ करीत असताना वाहनाची धडक लागून प्रवाशांचा तोल जाण्याच्याही घटना घडल्या आहेत. तिकीट खिडकीकडे जाणार्‍या मार्गावरच बरीचशी वाहने लावलेली असतात. त्यामुळे बरेचदा घाई गडबडीत प्रवाशांची गाडीही सुटते.

सीसीटीव्ही नसल्यांने चोरांची चलती

स्थानकावर चोरीच्या घटना देखील घडल्या आहेत, फलाटावर झोपलेल्या प्रवाशांच्या खिशात मोबाईल काढून चोरून नेणे, पाकीट मारणे,मद्यपिंकडून प्रवाशांना त्रास होणे,आदि घटना येथे घडल्या असल्याची माहिती प्रवासी देतात,त्यामुळे भविष्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता स्थानकावर सीसीटीव्ही असणे आवश्यक आहेत.

रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी कुठल्याच सोयीसुविधा उपलब्ध नाही.प्लॅटफॉर्म आणि स्थानकाबाहेर विजेची व्यवस्था नाही.नुसती रेल्वे सुरू करून चालणार नाही तर प्रशासनाने रेल्वे प्रवाशांना सर्व सोयीसुविधा निर्माण करून द्यायला हव्यात – विजय जितकर (अकोट) रेल्वे प्रवासा