अकोला

अकोट येथील संपकर्‍यांच्या आंदोलनास वाढता पाठिंबा

अकोट: जुनी पेन्शन सह इतर मागण्यांसाठी राज्यातील जिल्हा परिषद मध्यवर्ती संघटना, शासकीय व निमशासकीय संघटना तसेच शिक्षक व शिक्षकेतर संघटना अशा ७२संघटनांनी संप पुकारला आहे. दिनांक १४ मार्चला अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चात सहभागानंतर कालपासून अकोट येथील कर्मचार्‍यांनी तहसील कार्यालयात उपस्थित राहून विविध माध्यमातून निदर्शने करण्याचे ठरवले आहे.

त्या अंतर्गत आज तिसर्‍या दिवशी सर्व कर्मचारी संघटनेची सहविचार सभा पार पडली. त्यानंतर अकोट विधानसभेचे माजी आमदार संजय गावंडे, जिल्हाप्रमुख दिलीप बोचे, रोशन पर्वतकर ,एडवोकेट मनोज खंडारे, अमोल पालेकर यांनी भेट देत. आपल्या संपात शिवसेनेतर्फे पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले आणि जुनी पेन्शन मिळवण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आपल्या सोबत असल्याचे सुतोवाच केले.

त्यानंतर माजी पंचायत समिती सदस्य साहेबरावजी भगत यांनी सुद्धा संप क-यांशी संवाद साधत आपण प्रामाणिकपणे काम करणारे कर्मचारी असल्याने जुनी पेन्शन हा आपला हक्क आहे आणि तो मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवावा आम्ही सर्व गावकरी आपल्या सोबत आहोत असे सांगितले. आपण ज्या विद्यार्थ्यांना घडवित आहात ते उद्याचे भावी नागरिक आणि कर्मचारी असणार आहे त्यामुळे जुनी पेन्शन हा त्यांच्या भविष्यासाठी सुद्धा आवश्यक असा मुद्दा आहे आणि तो सर्वसामान्य नागरिकांना पटवून देणे हे आपले कर्तव्य आहे असे सुतवाच केले.

कुठलीही आवश्यकता भासल्यास आम्हाला हाक द्या आम्ही तुमच्या सोबत राहू असे आश्वासन भेटी देणार्‍यांनी दिले. यानंतर पेन्शन फायटर संतोषजी सोळंके यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .पाच वाजल्यानंतर जे कर्मचारी अद्यापही संपात सहभागी झालेले नाहीत त्यांच्या भेटी घेऊन त्यांना संपामध्ये सहभागी करणे साठी आवाहन करण्यात येणार आहे. अशाप्रकारे तिसर्‍या दिवशी अकोट पंचायत समितीमधील कर्मचार्‍यांनी संपात सहभागी होत लढा दिला.