क्राईम

अकोट पोपटखेड रोडवर मुदतबाह्य परवाना व ६ ब्रास अवैध मुरूम वाहतूक  वाहन ताब्यात

  • स्वप्नील सरकटे
  • अकोट17ऑगस्ट:-पोपटखेड रोडवर अकोट न्यायालयाच्या जवळ दिनांक 16 ऑगस्ट सकाळी साडेसात वाजता दरम्यान महसूल विभागाच्या तपासणीत मुदत बाह्य परवाना सह  6 ब्रास अवैध गौण खनिजाची (मुरूमाची) वाहतूक करणारे वाहन नायब तहसीलदार हरीश गुरव यांच्या पथकाने ताब्यात घेतले. वाहन  क्रमांक  MH 40 Y 3284 असून चालकाचे नाव  श्रीराम कमल राक्षे  वय 28 वर्षे  रा. छिंदवाडा असे आहे.सदर वाहन ए सी शेख या कंपनीकडे काम करत असल्याचे माहीती महसुल विभागाने दिली असुन, या वाहनात अंदाजे ६ ब्रास मुरूम होता. प्रत्यक्षात खदान  साईट वर जाऊन रॉयल्टी बुकाची पडताळणीस गेले असता वाहन चालकाकडे असणाऱ्या 5 मुदतबाह्य परवाने हे 14 ऑगस्ट 2021 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत.त्यामुळे परवाना पुस्तक पुढील कार्यवाही साठी ताब्यात घेण्यात आले असुन ही कारवाई नायब तहसिलदार हरीश गुरव, मंडळ अधिकारी एम एन अढाऊ, मंडळ अधिकारी व्ही पी शेरेकर ,तलाठी गोपाल वानरे  यांनी केली.ताब्यात घ
  • घेतलेले  वाहन शहर पोलीस स्टेशन, अकोट येथे  लावण्यात आले आहे.पुढील कारवाई तहसीलदार अकोट हे करणार आहेत