क्राईम

अकोटातील भरदिवसा दरोडा प्रकरणातील आरोपीना ७२ तासात अटक..!अकोट शहर पोलीसाची कारवाई

*अकोट प्रतिनिधी:-दिनांक 31 ऑगस्ट रोजी बुधवार वेस अकोट येथे राहणारे अश्विन अमृतलाल सेजपाल वय 44 वर्ष हे त्यांचे कुटुंबासह खामगाव येथे त्यांच्या नातेवाईकांचे लग्न करता गेले असता त्यांच्या राहत्या घरी बुधवार वेस अकोट येथे त्यांचे वृद्ध आई-वडील एक मुलगी असे घरी हजर असताना दोन अनोळखी पुरुष व दोन महिला हे त्यांच्या तोंडाला स्कार्फ बांधून आपण कोरोना लस घेतलेली आहे का याबाबत विचारपूस करून आम्ही सर्वे करत आहोत असे सांगून फिर्यादीचे घरात जबरीने घुसून त्यांचे आई वडिलांचे व मुलीचे तोंडात कापसाचा बोळा घालून त्यांना मारहाण करून व त्यांचे हात-पाय बांधून घरातील नगदी 2700/- रुपये व एक मोबाईल किंमत अंदाजे 27000/- रुपये असा एकूण 29700/- रुपयांचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला अशा रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन अकोट शहर येथे चार अनोळखी आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक 819/2021भादवि कलम 394,452, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.दिनांक 3ऑगस्ट रोजी मिळालेल्या गुप्त बातमी वरून सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे 1)विठ्ठल नामदेव टवरे वय पन्नास वर्ष 2)सौ वैशाली विठ्ठल टवरे वय 45 वर्ष दोन्ही रा शिवाजीनगर, मोठे बारगण, अकोट, जिल्हा अकोला 3)संगम गणेशराव ठाकरे वय 32 वर्षे 4)सागर गणेशराव ठाकरे वय 30 वर्ष 5)अमृता संगम ठाकरे वय 25 वर्ष राहणार येवदा तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती हल्ली मुक्काम रमुक्ताई संकुल, कबुतरी मैदान ,अकोट, जिल्हा अकोला 6)सीमा विजय निंबोकार वय 35 वर्षे राहणार नर्सिंग कॉलनी अकोट यांना अटक करण्यात आली आहे.सदरची कारवाई म पोलीस अधीक्षक श्री जी श्रीधर  अकोला, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांचे मार्गदर्शनाखाली
स्था गून्हे शाखेचे संतोष महल्ले
पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या नेतृत्वात डीबी स्कॉड चे पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे उमेश सोळंके,उमेश पराये, राजेश वसे,सुलतान पठाण, गोपाल उघडते,गोपाल बुंदे, विजय चव्हाण, विजय सोळंके, दिलीप तायडे, वसीम शेख,अंकुश डोबाळे,विशाल दांदडे यांनी केली आहे.

अकोट शहरातील नागरीकानी अशाप्रकारच्या बनाव पासून सावध राहावे संशयास्पद व्यक्तीना घरात प्रवेश नाकारावा व आढळल्यास पोलीसात संपर्क करावा:-प्रकाश अहिरेपो,लीस निरीक्षक,शहर पोलीस अकोट.

सीसीटीव्ही कॅमेरे हा असा एक सुरक्षा कर्मी आहे जो ऊन वारा व पावसात आपल्या घर व दुकानाची तिसरा डोळा बनवून सुरक्षा करतो.तरी अकोट शहरातील व्यापारी व नागरिकांनी सी सी कॅमेरे बसवून सहकार्य करावे.:-राजेश जवरे,पोलीस उपनिरीक्षक  डी बी स्काॅड प्रमुख,शहर पोलीस स्टेशन अकोट