Kumar Vishwas
अकोला

प्रख्यात कवी कुमार विश्वास यांचे उपस्थितीमध्ये कवी संमेलन 24 ला अकोल्यात

तीक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटीचे आयोजन

अकोला : तीक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटीच्या वतीने प्रख्यात कवी कुमार विश्वास यांचे उपस्थिती मध्ये शुक्रवार 24 फेब्रुवारी रोजी अकोल्यात गोरक्षण रोडवरील गोरक्षण संस्थेच्या मागील मैदानात सायंकाळी 6.30 वाजता कवी संमेलन आयोजित करण्यात आले असून याच कार्यक्रमात सुगत वाघमारे यांच्या शेरोशायरीच्या सिरत या पुस्तिकेचेही कुमार विश्वास यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे अशी माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

8 तीक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटी ही संस्था संस्थापक अध्यक्ष सुगत वाघमारे यांच्या कुशल नेतृत्वाखाली गेल्या 20 वर्षांपासून अकोला जिल्ह्यात बालक, महिला आणि उद्योग या क्षेत्रात यशस्वीपणे कार्य करीत आहे. संस्थेच्या वतीने नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.

त्याच शृंखलेत येत्या शुक्रवारी 24 फेब्रुवारी 2023 रोजी प्रख्यात कवी कुमार विश्वास यांच्या कवी संमेलनाचा कार्यक्रम गोरक्षण रोडवरील गोरक्षण संस्थेच्या मागील मैदानात सायंकाळी 6.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

बालकांच्या हक्कासाठी या जनजागृतीपर कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कवी संमेलनात कुमार विश्वास यांच्या सोबत काही प्रख्यात हिंदी आणि मराठी कवीही सहभागी होत आहेत. अकोलेकरांसाठी ही एक पर्वणीच आहे. यावेळी कविता तिवारी, रमेश मुस्कान, सुदीप भोला आणि कुशल कुशवाहा हे नामवंत कवीही उपस्थित राहणार आहेत.

अकोल्यातील काव्य रसिकांनी या कवी संमेलनास बहु संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तीक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष सुगत वाघमारे, सचिव विष्णुदास मोंडोकार, गझलकार भीमराव पांचाळ, ऍड नितीन धूत, श्रीकांत पिंजरकर विशाल शिंदे यांनी केले आहे.