अकोला

अकोल्यात माध्यमिक शाळेच्या टेरेसवर अर्भक अन् मांसाचे गोळे

अकोला : अकोला शहरातील जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यमिक शाळेत आज सकाळी एक नवजात अर्भक आणि ३ मासांचे गोळे आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ४ ते ५ महिन्याचे हे अर्भक आहे. पोलिसांनी अर्भक ताब्यात घेऊन ते तपासणीसाठी अकोला शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. आता वैद्यकीय अहवालातच स्पष्ट होणार की नेमकं हे किती अर्भक आहेत?.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी १० वाजता अकोला शहरातील रतनलाल प्लांट परिसरातील जिल्हा परिषदच्या उर्दू माध्यमिक शाळेच्या आवार मैदानात मुलं क्रिकेट खेळ असतानां त्यांचा चंडू शाळेच्या टेरेसवर गेला. चेंडू वर आणण्यासाठी गेलेल्या मुलांना हे एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये अर्भक आढळून आलं. त्यांनी याची माहिती लगेच स्थानिक लोकांना दिली. पोलिसांना माहिती देताच सिव्हिल लाईन पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. हे अर्भक शासकीय रुग्णालयात पाठवलं आणि या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. उर्दू माध्यमिक शाळेच्या टेरेसवर हे अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अंदाजे चार ते पाच महिन्याचं हे अर्भक असल्याचं सांगण्यात येत आहे. अर्भक कुठन आलं? ते कुणी टाकलं? यासाठी पोलीस स्थानिक आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी करणार आहेत. अर्भक शाळेच्या टेरेसवर कोणी टाकलं? याचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात येणार आहे.
दरम्यान, टेरेसवर एक अर्भक आणि तीन मासांचे गोळे आहे. त्यातील एक अर्भक असून बाकीच्या मासांचे वैद्यकीय तपासणी होणार आहे. त्यानंतरच सर्व बाबी स्पष्ट होतील असं पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकरणी अधिक तपास सिव्हिलिंग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजित जाधव करत आहेत.

अर्भक शासकीय रुग्णालयात पाठवलं आणि या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. उर्दू माध्यमिक शाळेच्या टेरेसवर हे अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अंदाजे चार ते पाच महिन्याचं हे अर्भक असल्याचं सांगण्यात येत आहे. अर्भक कुठन आलं? ते कुणी टाकलं? यासाठी पोलीस स्थानिक आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी करणार आहेत. अर्भक शाळेच्या टेरेसवर कोणी टाकलं? याचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात येणार आहे.