राजकीय

एक जुलैपासून नवीन कायदे लागू

नवी दिल्ली : केंद्र सरकारने अलीकडेच भारतीय दंड संहिता आणि फौजदारी प्रक्रिया संहिता यांमध्ये काही बदल केले. या कायद्यांमध्ये केलेल्या नव्या सुधारणा, नव्या तरतुदी, नवीन कलमे दि. १ जुलैपासून लागू केली जाणार आहेत. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे नवीन कायदे भारतीय दंड संहिता आणि फौजदारी प्रक्रिया संहिता यांची

Read more
राजकीय

४ राज्यांमध्ये आप-काँग्रेसमधील जागावाटपावर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत आम आदमी पार्टी (आप) आणि काँग्रेसमध्ये एकमत झाले असून दिल्ली, गुजरात, गोवा आणि हरियाणा अशा ४ राज्यांमध्ये आप-काँग्रेसमधील जागावाटपावर शिक्कामोर्तब’ झाले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात आप आणि काँग्रेस यांच्यातील करार अंतिम झाला आहे. आज दिल्लीत दोन्ही पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाची माहिती दिली. पत्रकार परिषदेला आपकडून आतिशी,

Read more
राजकीय

शिवसेना उबाठा गटातील नेते वायकर हे ईडीच्या रडारवर

मुंबई : भाजपाचे वॉशिंग मशीन पुन्हा एकदा कामाला लागले आहे. शिवसेना उबाठा गटातील नेते आमदार रवींद्र वायकरांनी पंचतारांकित हॉटेल बांधताना 500 कोटींचा घोटाळा केला असा आरोप किरीट सोमय्यांनी करताच पालिकेनेही त्यांना नोटीस बजावली होती. पण वायकरांनी भाजपाशी मैत्री असलेल्या शिंदे गटात जाण्याचे मान्य करताच वायकरांच्या निवेदनावर आम्ही विचार करू, असे निवेदन आज पालिकेने न्यायालयात दिले

Read more
राजकीय

बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू मनोहर जोशी यांचे निधन

मुंबई :  शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे आज पहाटे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 86 वर्षांच्या जोशी यांना गुरुवारी रात्री अत्यवस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. संध्याकाळी 5 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसस्कार करण्यात आले. मनोहर जोशी

Read more
ताज्या बातम्या राजकीय

सुसंस्कृत, व्यासंगी नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला  : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

मुंबई  :  शिक्षणातील ‘सर’ ते लोकसभा अध्यक्ष म्हणून ‘स्पीकर सर’ अशी भारदस्त कारकीर्द असणाऱ्या महाराष्ट्र सुपुत्राला काळाने आपल्यातून हिरावून घेतले आहे, अशी शोकमग्न भावना व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. आपल्यासाठी वैयक्तिक पातळीवर ही मोठी हानी आहे, असे नमूद करुन मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र विकासाची चौफेर

Read more
राजकीय

राज्याची दूध उत्पादक शिखर संस्था अखेर केंद्र सरकारच्या ताब्यात

मुंबई : राज्याची दूध उत्पादक शिखर संस्था महानंदा डेअरी अखेर केंद्र सरकार संचालित राष्ट्रीय दुग्धविकास संस्थेच्या ताब्यात गेली आहे. विशेष म्हणजे या संस्थेचे मुख्यालय गुजरात राज्यातील आणंद गावी आहे. याच आणंद गावात अमूलचे मुख्यालय आहे. महानंदा डेअरी हळूहळू पूर्ण बंद करून डेअरीची गोरेगाव येथील 50 कोटी रुपयांची 27 एकरची प्रचंड जमीन अदानी उद्योगाकडे देण्याचे हे

Read more
राजकीय

आज पंतप्रधान मोदी जम्मूच्या दौऱ्यावर

जम्मू : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या जम्मूच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते जम्मूच्या (सांबा) विजयपुरातील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) उद्घाटन करणार आहेत. त्यासोबत 13,375 कोटींच्या अनेक प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायभरणी करणार आहे. मोदी यांच्या दौऱ्यासाठी स्थानिक जिल्हा प्रशासन आणि पोलीस सज्ज झाले आहे असून जम्मूत ड्रोन, रिमोट-नियंत्रित मायक्रोलाईट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरा-मोटर हँड ग्लायडर आणि हॉट

Read more
राजकीय

नाशिकचे खासदार गोडसेंच्या कारला भीषण अपघात

नवी दिल्ली : दिल्लीतील बी.डी.रोडवर नाशिकचे खासदार हेमंत गोडसेंच्या कारला आज सकाळी अपघात झाला. या अपघातातून हेमंत गोडसे आणि त्यांच्यासह असलेले सहकारी थोडक्यात बचावले. त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आयोजित केलेल्या शिवजयंती सोहळ्यासाठी खासदार हेमंत गोडसे आपल्या सहकाऱ्यांसोबत कारने बी. डी. मार्गावरुन जात होते. गोडसे यांची कार दुसऱ्या कारला ओव्हरटेक करत

Read more
राजकीय

​21 फेब्रुवारीनंतर सरकारसोबत चर्चाही बंद

जालना : सरकारने उद्याच्या अधिवेशनात सगेसोयर्‍यांच्या कायद्याची अंमलबजावणी केली नाही तर आमची आंदोलनाची दिशा ठरली आहे. सरकारला उद्या पर्यंत वेळ दिला आहे. मात्र उद्या कायद्याची अंमलबजावणी झाली नाही, तर 21 फेब्रुवारीनंतर सरकारसोबत चर्चाही बंद होईल, असा इशारा मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी आज दिला. जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा आज दहावा दिवस होता. मनोज जरांगे यांच्या अंतरवाली

Read more
राजकीय

ठाणेचा बालेकिल्ला आमचाच आदित्य गरजले

ठाणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या होमग्राऊंडवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना आपल्या विरुद्ध निवडणूक लढवण्याचे जाहीर आव्हान दिले. निवडणुका, फोडाफोडी, आरोप-प्रत्यारोप या सगळ्याच मुद्द्यांवरुन आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि राज्य सरकारला धारेवर धरले. आज ठाण्यातील जाहीर सभेत बोलताना आदित्य ठाकरे भलतेच आक्रमक झाले. ते म्हणाले की, ठाणे पुन्हा एकदा

Read more