देश मुंबई

८२ वर्षांच्या चॉकलेट कंपनीचे मालक बनले अंबानी!

मुंबई : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स कंझ्युमरने आणखी एक कंपनी विकत घेतली आहे. रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्टस महाराष्ट्रातील ८२ वर्षांची जुनी कंपनी असलेल्या रावळगाव शुगर फार्मचा मिठाई व्यवसाय खरेदी केली आहे.ही कंपनीने रावळगाव ब्रँडच्या नावाने कॉफी ब्रेक, टुटी फ्रूटी,पान पसंद सारखे ९ बँड चालवते. हा खरेदी करार २७ कोटी रुपयांना झाला आहे. आता करारानुसार रावळगाव शुगर फार्म या कंपनीचे ट्रेडमार्क,पाककृती आणि बौद्धिक संपदा हक्क आता रिलायन्सकडे आले आहेत. रावळगाव शुगर फार्म यांनी शुक्रवारी एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली. उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी १९३३ मध्ये महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील रावळगाव गावात साखर कारखान्याची स्थापना केली. १९४२ मध्ये या कंपनीने रावळगाव ब्रँड अंतर्गत टॉफी बनवण्यास सुरुवात केली.या कंपनीचे पान पासंद, मँगो मूड आणि कॉफी ब्रेक असे नऊ ब्रँड आहेत.सुरुवातीला ही कंपनी साखरेचे काम सांभाळायची. १९४० पासून मिठाई व्यवसायात उतरली.या कंपनीच्या एकूण विक्रीपैकी ५० टक्के विक्री महाराष्ट्रातून होते.ही कंपनी अनेक दशकांपासून विविध उत्पादने तयार करत आहे. अलिकडच्या वर्षांत कंपनीला व्यवसाय टिकवणे कठीण झाले आहे.या उद्योगातील वाढलेल्या स्पर्धेमुळे कंपनीचा बाजारातील हिस्सा कमी झाला आहे.साखरेच्या किंमतीत झालेली वाढ आणि ऊर्जेचा आणि मजुरीचा जास्त खर्च यामुळे कंपनीचा नफा कमी झाला आहे.कोविड आणि लॉकडाऊनमुळे शाळा आणि कार्यालये बंद झाली आणि कंपनीची विक्री या काळात कमी झाली.त्यामुळेच या कंपनीवर ही वेळ आली आहे.