क्राईम

24 तासाच्या आत खुनाच्या गुन्ह्याची उकल! अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी!

  1. पातूर प्रतिनिधी:-22ऑक्टोबर रोजी पातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या तांदळी ते माझोड दरम्यान येत असलेल्या फटक्याच्या कारखान्याजवळ सायंकाळी सहा ते सात वाजता दरम्यान डाबकी रोडवर असलेल्या रेणुका नगर मध्ये रहिवासी असलेल्या 28 वर्षीय तरुणाचा खून झाला होता. अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 24 तासाच्या आत या खुनाच्या गुन्ह्याची उकल केल्याची कामगिरी बजावली आहे.प्रशांत प्रमोद बडगे वय 28 वर्षे रा रेणुका नगर डाबकी रोड अकोला असे हत्त्या करण्यात आलेल्या तरुणाचे नांव असून, नितेश प्रकाश हातोले वय 35 वर्षे रा.माझोड असे हत्येच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नांव आहे.याप्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी आहे की, मृतक प्रशांत बडगे आणि  आरोपी नितेश हातोले हे दोघेही बजाज फायनान्स कंपनी मध्ये काम करायचे.त्यामुळे दोघांची ओळख होती. घटनेच्या दिवशी संध्याकाळी 6 ते 7 वाजता दरम्यान दोघेही सोबत दारू पिऊन, ते तांदळीच्या दिशेने गेले होते. माझोड ते तांदळी रोडवरील फटका कारखान्या जवळ दोघांच्या मध्ये वाद झाला.हा एवढा इकोपला गेला की,नितेशने बाजूला पडलेला मोठा दगड उचलून प्रशांत बडगेच्या डोक्यात टाकला, आरोपी इतक्यावरच न थांबता तोच दगड चार ते पाच वेळा प्रशांतच्या डोक्यात घालून, त्याला यमसदनी पाठवून, त्या ठिकानातून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच पातूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहचून, घटना स्थळाची पाहणी करून, संशयित आरोपी म्हणून नितेश हातोले याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन, त्याची कसून चौकशी केली असता,त्यानेच प्रशांतची हत्त्या केल्याची कबुली दिली आहे. त्यावरून त्याला खुनाच्या गुन्ह्यात अटक केली आहे.नितेशने प्रशांत बडगेची हत्या का केली याचा तपास पातूर पोलीस करीत आहेत. ही कारवाई अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय महेश गावंडे,पोलीस कॉन्स्टेबल संदीप ताले,श्रीकांत पातोंड, दत्ता ढोरे, विशाल मोरे यांनी केली.