देश

१५सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते नव्या टीव्ही वाहिनेचे लोकार्पण

 नवी दिल्ली११सप्टेंबर:- लोकसभा आणि राज्यसभा मिळून तयार करण्यात आलेल्या, संसद टीव्ही या नव्या टिव्ही वाहिनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. या वाहिनीवरून . काँग्रेसचे वरिष्ठ नेते कर्ण सिंह, अर्थतज्ज्ञ बिबेक देब्रोय, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि वकील हेमंत बत्रा हे या नवीन वाहिनीवर स्वतंत्र कार्यक्रमांचे संचालन करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. देशातील संसदेचं अधिवेशन सुरू झाल्यावर संसद टीव्हीवर लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजाचे थेट प्रसारण केले जाईल. संसद टीव्ही ही वाहिनी पंतप्रधान मोदी, उपराष्ट्रपती एम. व्यकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या उपस्थितीत औपरिकरित्या लाँच केली जाईल.काँग्रेस नेते कर्ण सिंह हे विविध धर्मांबाबत तर बिबेक देब्रोय हे इतिहास आणि अमिताभ कांत हे भारतातील सुधारणांवरील कार्यक्रमाचे संचालन करतील. हेमंत बत्रा कायद्यांशी संबंधित विषयांवर कार्यक्रमाचे संचालन करतील. अर्थमंत्रालयाचे प्रमुख सल्लागार संजीव सान्याल अर्थव्यवस्थेवर आणि शल्य चिकीत्सक अंबरीश मिथायी हे आरोग्यसंबंधीच्या विषयांवरील कार्यक्रमाचे संचालन करतील.भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाचे माजी सचिव रवी कपूर हे संसद टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. तर लोकसभा सचिवालयातील संयुक्त सचिव मनोज अरोरा हे १५सप्टेंबरला लाँच होणाऱ्या वाहिनेचे विशेष कार्यकारी अधिकारी असणार आहेेत.