अकोला

संपस्थळी घुमले कवितेचे स्वर; कवितेतून अकोटच्या कर्मचार्‍यांनी मांडल्या व्यथा

अकोट: जुनी पेन्शन सह इतर मागण्यांसाठी राज्यातील जिल्हा परिषद मध्यवर्ती संघटना, शासकीय व निमशासकीय संघटना तसेच शिक्षक व शिक्षकेतर संघटना अशा ७२संघटनांनी संप पुकारला आहे.

आज संपाचा पाचवा दिवस असून जुनी पेन्शन लागू होईपर्यंत माघार घेणार नसल्याचे संपकरी यांनी आज सांगितले. संपस्थळी आज कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते कवी संमेलनातून कवींनी पेन्शनची मागणी करत संप कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

सदर कवी संमेलनात विविध विभागाच्या निलेश बाहाकर, ज्ञानेश्वर खापरकर, कैलास अंबळकार,अमर भागवत, वृंदा खराटे ,धनंजय वावगे, गोपाल भोरखडे ,शितल जायले ,अनुराधा सोनोने चंद्रशेखर महाजन, दिगंबर खडसे प्रशांत मुळे, सुनीता बारेवार, शंकर गवई, गजानन चव्हाण,प्रविण तायडे अजीत सपकाळया कर्मचार्‍यांनी आपल्या कविता सादर केल्या.मनोज लोडम सरांच्या पाच वर्षाच्या मनस्मितने कविता सादर करीत सर्वांची मने जिंकली.

कालपासून अकोट येथील कर्मचारी तहसील कार्यालयात उपस्थित राहून विविध माध्यमातून निदर्शने करीत आहेत. त्या अंतर्गत आज पाचव्या दिवशी सर्व कर्मचा-यांनी तहसील कार्यालयासमक्ष हजर राहून पेंशन या विषयावरील कवितेचा आस्वाद घेतला.

कवीसम्मेलनाचे सूत्र संचलन पेन्शन फायटर चंद्रशेखर महाजन यांनी केले. आज संपस्थळी सेवानिवृत्त पेंशनर संघटनेचे जिल्हा सचीव त्र्यंबकराव सावरकर सर,अघडते सर,रुमाले सर,ज.शा. गावंडे,चोटीया सर,भाष्कर देशमुख तालुका अध्यक्ष थारकर सर, हुसेन अहमद सर,राजू कुलट यांनी सक्रीय सहभाग देत तालुक्यातील सर्व संघटनांच्या अध्यक्षांची बैठक घेऊन आपल्या तालुक्यातील शंभर टक्के शाळा कशा बंद राहतील यासाठी प्रयत्न करण्याचे समन्वय समितीच्या सदस्यांना सांगितले.

सोबतच अभूतपूर्व असा हा संप होत असल्याने या संपात सर्वांनी शंभर टक्के सहभागी व्हावे. आम्ही सुद्धा उद्यापासून आपल्या संपात सक्रिय सहभाग घेणार असून आपले मनोबल खच्ची होऊ देऊ नका असे मार्गदर्शन केले .अशाप्रकारे पाचव्या दिवशीही अकोट पंचायत समितीमधील कर्मचार्‍यांनी संपात सहभाग दिला.