Collector's-Office AKola
अकोला

संत गाडगेबाबा जयंती : जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

अकोला: संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. लोकशाही सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी- अधिकारी यावेळी उपस्थित होते.