देश

 विद्यार्थी संघटनेच्या वतीने बिहार बंदची घोषणा!

ऑन लाईन : विद्यार्थी संघटनांनी बिहार बंदची घोषणा केल्यानंतर भल यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणासह देशभरातल पोलीय यंत्रणा सज्ज झालो आहे.

मोदी सरकार ने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेच एकीकडे स्वागत होत आहे तर दुसरीकडे काही प्रमाणात विरोध होताना दिसत आहे. अनेक राज्यात हिंसाचाराच्या घटना घडत आहे. आता अग्निपथ योजनेच्या विरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर पंजाब, हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेशसह देशातील पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर आहेत.लष्कर भरतीसाठी केंद्र सरकाकडून घोषणा करण्यात आलेल्या नवीन अग्निपथ योजनेला  देशभरातून विरोध कायम आहे.

देशभरातील तरुण रस्त्यावर उतरले असून त्यांच्याकडून हिंसक निदर्शनं सुरुच आहेत. आज अग्निपथ योजनेविरोधात ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

बिहारमधील तरुण आणि विद्यार्थी संघटनांनी बिहार बंदची हाक दिल्यानंतर भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणासह देशभरातल पोलीय यंत्रणा सज्ज झालो आहे.