क्राईम

लग्नाशिवाय जन्माला येणाऱ्या मुलाला वडिलांचे नांव लावणे बंधनकारक नाही!

 

!

अहमदाबाद२६ऑगस्ट:-गुजरात मधील जुनागढ येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक संबंध ठेऊन, तिला गर्भधारणा होऊन दोन अपत्य झाली .या प्रकारात गुन्हा सिद्ध झालेल्या आरोपीला न्यायालयाने १० वर्षाची शिक्षा सुनावली आहे.अल्पवयीन मुलीवर केलेल्या बलात्कार प्रकरणी सत्र न्यायालयातुन  शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान  लग्न न करता जन्माला आलेल्या मुलांना वडिलांचे नांव लावणं बंधनकारक नसल्याचं मत गुजरात उच्च न्यायालयान नोंदविल.या प्रकरणातील थोडक्यात हकीकत अशी आहे की,पीडित मुलगी तिच्या मर्जीने आरोपी युवकासोबत राहत होती.हे प्रकरण बाल लैंगिक अत्याचार कायदा पास्कोशी संबंधित आहे.मुलगी अल्पवयीन असल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.पीडित मुलगी जुनागढ जिल्ह्यातील रहिवासी आहे. लग्नाशिवाय दोषीसोबत राहत असताना तिने दोन मुलांना जन्म दिला. दोन्ही मुलांच्या वडिलांनीही त्यांना स्वतःचे म्हटले आहे. मुलगी म्हणाली, तिने स्वतःच्या इच्छेने वडिलांचे घर सोडले आणि दोषी युवकासोबत राहू लागली. या काळात तिने दोन मुलांना जन्म दिला. पहिल्या मुलाला तिने अल्पवयीन असताना जन्म दिला. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने विचारले- ती एक गरीब ग्रामीण मुलगी आहे. जर अविवाहित स्त्री विवाहाशिवाय गर्भवती झाली आणि ती रुग्णालयात गेली तर डॉक्टर तिला त्या मुलाच्या वडिलांचे नाव विचारू शकतात का?खंडपीठाने म्हटले की, असे वाटत नाही की महिलेने आपल्या मुलाच्या वडिलांचे नाव नमूद करणे आवश्यक आहे. स्त्रीसाठी अशी सक्ती कुठे नोंदवली आहे? मुलीच्या पहिल्या मुलाचा जन्म २९ जून २०१९  रोजी झाला होता, तर दुसऱ्या मुलाचा जन्म २२ जानेवारी २०२१ रोजी झाला होता. २४ मार्च २०२० रोजी मुलगी १८  वर्षांची झाली. दुसऱ्या दिवशी, २५ मार्च रोजी तिचं लग्न दोषी युवकाशी होणार होत, परंतु करोनापासून बचाव करण्यासाठी असलेल्या लॉकडाऊनमुळे लग्न होऊ शकलं नाही. तर दुसरे अपत्य झाल्यानंतर मुलीच्या वडिलांनी पहिल्या अपत्य ती अल्पवयीन असतांना झालं,असे पुरावे सादर करून बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. मुलीच्या वडिलांनी दाखल केलेल्या पुराव्यांच्या आधारे  नमूद तरुणाला  न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे.