राजकीय

राज्यसभेत काँग्रेसकडून व्हीप म्हणून खासदार रजनीताई पाटील, तर गटनेतेपदी मल्लिकार्जुन खर्गे कायम

मुंबई: राज्यसभेत काँग्रेसनं व्हीप म्हणून खासदार रजनीताई पाटील यांची नियुक्ती केली आहे. तर उत्तर प्रदेशातील आपले ज्येष्ठ नेते प्रमोद तिवारी यांची राज्यसभेतील उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली आहे. बजेट अधिवेशनामध्ये निलंबनाची कारवाई झालेल्या रजनीताई पाटील यांची काँग्रेस कडून व्हीप म्हणून नियुक्ती अर्थसंकल्पीय अधिवेशनात रजनीताई पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. त्यानंतर आता पाटील यांच्यावर काँग्रेसनं मोठी जबाबदारी सोपवली आहे.

राज्यसभेतील काँग्रेसचे उपनेते म्हणून प्रमोद तिवारी यांची निवड करण्यात आली आहे. याआधी हे पद आनंद शर्मा यांच्याकडे होते. तर राज्यसभा गटनेतेपदी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हेच तूर्तास कायम आहेत. काँग्रेसमध्ये अध्यक्षपद मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे आल्यानंतर राज्यसभेतला गटनेता बदलला जाईल, अशी चर्चा होती. पण तूर्तास तो बदल झाला नाही.

काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी प्रमोद तिवारी यांची राज्यसभेतील पक्षाचे उपनेतेपदी आणि रजनी पाटील यांची व्हिप म्हणून नियुक्तीला मान्यता दिली आहे. राज्यसभेचे अध्यक्ष यांना या नियुत्तäयांची माहिती देण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे पक्षाचे नेते म्हणजेच राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आहेत.

आनंद शर्मा यांचा राज्यसभेचा कार्यकाळ गेल्या वर्षी संपल्याने पक्षाकडे उपनेते नव्हते. त्यामुळं आता उत्तर प्रदेशचे प्रमोद तिवारी यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते राजस्थानचे राज्यसभा सदस्य आहेत. महाराष्ट्राच्या असलेल्या रजनी पाटील या त्यांच्याच राज्यातून राज्यसभेच्या सदस्य आहेत. १३ मार्चपासून सुरु होणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्‍या टप्प्याच्या दोन दिवस आधी काँग्रेसनं या नियुत्तäया केल्या आहेत.