क्रीडा

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत अमरावती-अकोला परिमंडलाच्या खेळाडूंचे यश

कुस्ती,टेबल टेनिससह धावण्यातही सुवर्ण पदक, एकुण ६ सुवर्ण,२ रजत पदकावर शिक्कामोर्तब

अकोला, दि.२० फेब्रुवारी २०२३: जळगाव येथे नुकत्याच झालेल्या महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धेत अमरावती -अकोला परिमंडलाच्या संयुक्त संघाने कुस्ती,टेबल टेनिस व धावणे या क्रीडा प्रकारांत सात सुवर्णपदके पटकावली आहेत.

अमरावती -अकोला परिमंडलात कार्यरत पदकविजेत्या सर्व कर्मचारी खेळाडूंचा प्रादेशिक संचालक सुहास रंगारी व मुख्य अभियंता अमरावती परिमंडल ज्ञानेश कुलकर्णी यांनी कौतुक करत अभिनंदन केले.

एकुण २३ क्रीडा प्रकारात खेळल्या गेलेल्या महावितरणच्या राज्यस्तरीय स्पर्धेकरीता अमरावती-अकोला संयुक्त संघातील सांघिक स्पर्धेसाठी पुरूष गटातून ६४ तर महिला गटातून ३२ खेळाडूंची, तर वयक्तीक क्रीडाप्रकारात पुरूष गटातून २२ आणि महिला गटातून ११ खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाले होते.

अमरावती – अकोला संघातिल एकेरी आणि वयक्तीक क्रीडाप्रकारात यवतमाळ येथे कार्यरत असलेल्या सहाय्यक अभियंता स्नेहल बढे यांनी टेबल टेनिस या क्रीडाप्रकारात उत्तम कामगीरी करत अंतीम सामन्यात भांडूप परिमंडलाच्या अश्विनी शिंदे यांच्यावर मात करत सुवर्ण पदक पटकावले,तर यावेळी अमरावती परिमंडलाच्या कुस्ती संघाने विविध वजनी गटात ३ सुवर्ण पदके पटकावली.

त्यामध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ,विनोद गायकवाड यांनी ६१ किलो वजनी गटात,वरीष्ठ तंत्रज्ञ संदिप नेवारे यांनी ७९ किलो वजनी गटात, तर  वरिष्ठ तंत्रज्ञ मोहम्मद मुजाहीद ९७ किलो वजनी गटात सुवर्ण पदके पटकावली आहे.विशेषता कुस्ती क्रीडा प्रकारातील तीनही सुवर्ण पदके ही कुस्तीचे माहेर घर असलेल्या कोल्हापूर परिमंडलाविरूध्द पटकावली आहे. याशिवाय अकोला परिमंडलातील शिपाई पदावर कार्यरत असणारे शुभम मात्रे यांनी १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत अंतीम सामन्यात उपविजेतेपद पटकावत रजत पदक पटकावले आहे.

सांघिंक क्रीडा प्रकारात उपकार्यकारी अभियंता मनिशा बुरांडे,सहाय्यक अभियंता स्नेहल बढे, सहाय्यक अभियंता कोमल पुरोहीत,तंत्रज्ञ स्वाती जाधव यांनी सुवर्ण पदक मिळविले,दुहेरी क्रीडा प्रकारात सहाय्यक अभियंता स्नेहल बढे आणि उपकार्यकारी अभियंता मनिशा बुरांडे यांनी टेबल टेनिसच्या अंतीम सामन्यात अणुक्रमे भांडूप आणि कोल्पापूर परिमंडळावर मात करत दुहेरी आणि सांघिक खेळात प्रत्येकी एक याप्रमाणे दोन सुवर्ण पदके पटकावली. ब्रीज या खेळात कार्यकारी अभियंता (प्रशासन)प्रशांत गायकवाड आणि कार्यकारी अभियंता (चाचणी)यांनी रजत पदक पटकावले.

राज्यस्तरीय खेळाकरीता परिमंडल प्रशिक्षक आणि समन्वयकाची भूमिका सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी (प्रभारी) मधूसुदन मराठे,उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विशाल पीपरे यांनी पार पाडली.