क्राईम

मनसेच्या शहर अध्यक्ष यांच्या विरोधात पोलिसांचे सर्च वॉरंट! कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता!

मुंबई न्यूज डेस्क:-१७ऑगस्ट,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराचे अध्यक्ष यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी अटक सर्च वॉरंट काढल्याने,राज ठाकरे यांचे निकटवर्तीय समजल्या जाणारे,गजानन काळे,नवी मुंबई शहर अध्यक्ष यांच्या अडचणीत वाढ झाली असून, त्यांच्यावर अटकेची लटकती तलवार आहे.मुंबई पोलीस त्यांना कोणत्याही क्षणी अटक करू शकतात.याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, गजानन काळे यांचा २००८साली एका मागासवर्गीय महिलेसोबत झाला होता.लग्न झाल्यानंतर१५दिवसांतच गजानन काळे आणि त्यांच्या पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून खटके उडायला सुरवात झाली होती.गजानन काळे हे त्यांच्या पत्नीला जातीवाचक शिवीगाळ करून,तिच्या वर्णनावरून टोमणे मारीत, मारहाण करीत असल्याची,तसेच गजानन काळे यांचे बाहेरील महिलेसोबत अनैतिक संबंध आहेत अशी तक्रार ,नवी मुंबईच्या हद्दीत येत असलेल्या नेरुळ पोलीस ठाण्यात दिली होती,त्या तक्रारीच्या आधारे मनसे नवीमुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होऊन बराच वेळ उलटूनही काळे यांना अटक होत नसल्याने,काळे यांच्या पत्नीने वरिष्ठांकडे काळे यांच्या मागणीची लावून धरली होती. अशातच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे नवी मुंबईच्या दौऱ्यावर आल्यानंतर, उपस्थित पत्रकारांनी गजानन काळे यांच्या अटकेच्या संबंधीत प्रश्न उपस्थित केल्यावर, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी, पोलिसांना काळे यांना अटक करुन योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले असून पोलीस लवकरच काळे यांना अटक करतील असे सांगितले आहे. तसेच शिवसेनेच्या आमदार निलमताई गोरे यांनी सुद्धा गजानन काळे यांना त्वरित अटक करावी अशी मागणी पोलीस आयुक्त यांच्याकडे केल्याने,नवीमुंबई पोलिसांनी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात सर्च अटक वॉरंट जारी केला असून,पोलीस अटक करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत.नीलमताई गोरे यांनी पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात गजानन काळे यांच्या विरोधात सबळ पुरावे गोळा करून, लवकरात लवकर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात यावे अशी मागणी सुद्धा केली आहे