Paynow-UPI
अर्थ ताज्या बातम्या

भारतीय UPI आज सिंगापूरच्या Pay Now शी जोडले जाईल, पंतप्रधान असतील साक्षीदार

नवी दिल्ली, २१ फेब्रुवारी :  भारताचा युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) जगात झपाट्याने लोकप्रिय होत आहे. सिंगापूरचे PayNow आणि भारताचे UPI यांच्यातील क्रॉस-बॉर्डर कनेक्टिव्हिटी आज (मंगळवार) लाँच होणार आहे.

यामुळे दोन्ही देशांमधली क्रॉस-बॉर्डर कनेक्टिव्हिटी सहज आणि वेगाने पैसे ट्रान्सफर करता येईल.सिंगापूरमध्ये राहणारे भारतीय आता UPI द्वारे भारतात पैसे ट्रान्सफर करू शकतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग याचे साक्षीदार होणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या कार्यालयाने ही माहिती दिली.

पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मोदी सकाळी ११ वाजता (भारतीय वेळेनुसार) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या कार्यक्रमात सामील होतील.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि सिंगापूरच्या नाणे प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक रवी मेनन यांच्या हस्ते या सुविधेचे उद्घाटन होणार आहे.

फिनटेक इनोव्हेशनसाठी भारत सर्वात वेगाने वाढणारी इकोसिस्टम म्हणून उदयास आला आहे, असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.

भारतातील सर्वोत्तम डिजिटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चरचे जागतिकीकरण पुढे नेण्यात पंतप्रधान मोदींचे दूरदर्शी नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरले आहे.