Balapur-electricity
अकोला

बाळापुरात ६५ वीज चोरांवर महावितरणची कारवाई; ३१ हजार ४६३ युनीटची वीज चोरा

अकोला : जिल्ह्यात अनेकठिकाणी वीज चोरीचे प्रकार घडत असून, वीज चोरी रोखण्यासाठी महावितरण कंपनीकडून मोहीम सुरू आहे. वीज चोरी पकडण्याच्या मोहिमेत बाळापूर शहरात एकूण ३१ हजार ४६३ युनिट वीज चोरीच्या ६५ वीज चोर्‍या उघड करण्यात आल्या आहेत.

शहरात वीजबिलाची थकबाकी आणि वीज चोरीचे प्रमाण बघता मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता यांनी दिली आहे.जिल्ह्यात अनेक ठिकाणी िवद्युत चोरीचे प्रकार घडत असून, अनेक वेळा महािवतरणकडून कार्यवाहीदेखील होत आहे. मात्र तरीही हे प्रकार थांबत नाहीत. वीज पुरवठा कायम स्वरूपी खंडित करूनही वीज बिलाचा भरणा न करणाऱ्या ग्राहकाची महावितरणकडून आकस्मिक तपासणी करण्यात येत असतांना बाळापूर येथे वीज चोरीचे प्रकार आढळून आले.

वीज चोरी करणे हा कायद्याने गुन्हा आहे.तसेच विद्युत कायद्याअंतर्गत शिक्षेचेही प्रावधान या कायद्यात आहे. वीज ग्राहकांनी इतर कुणालाहा अवैधरित्या वीज पुरवठाकेल्यास,त्यांच्यावरही कारवाई यापुढे करण्यात येणार आहे. मार्च महिनाअसल्याने महावितरणकडून वीजबिल वसुलीला वेग देण्यात आला आहे. वसुलीसाठी महावितरण कर्मचारी ग्राहकांच्या घरापर्यंत येत आहे.अशा वेळी ग्राहकांनी कर्मचार्‍यंशी वाद न घालता वीज बिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरण बाळापूर शहर उपविभागातर्फे करण्यात येत आहे.

काय आढळले तपासणीत

महािवतरण कंपनीकडून तपासणी करण्यात आली. संशयित १४१ ग्राहकांच्या वीज वापराची व वीज मिटरची तपासणी केली करणर्‍यात आली. यात ६५ ग्राहकांच्या घरी वीज चोरी होत असल्याचे आढळले. पैकी ५७ वीज चोरीमध्ये अवैध म्हणजेच मागणी केलेल्या कामासाठी वीजेचा वापर न करता त्या वीजेचा वापर इतरअन्य कारणासाठी करण्यात येत असल्याचे आढळले.

१३ ग्राहकांनी मीटरला छेडछाड करून मीटर संत करण्याचा,मीटर बंद केले असल्याचे आढळले. त्यामुळ अवैध कारणासाठी वीज वापरलेल्या ग्राहकांवर विद्युत कायदा २००३ अंतर्गत कलम १२६ नुसार,तर मीटरशी छेडछाड करणार्‍या १३ ग्राहकांवर कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली आहे.

एकुण २ लाख ९३ हजाराच्या वीज चोरीवर २६ हजाराच्या दंडाची आकारणी करण्यात आली आहे.