अकोला

बायपास मार्गे जाणाऱ्या लालपरीला करावा लागला पत्रकारांचा सामना

बायपास मार्गे जाणाऱ्या लालपरीला करावा लागला पत्रकारांचा सामना

बोरगाव मंजू :-– येथील बस स्थानकावर थांबा मंजूर असूनही जलद अती जलद निमआराम व आराम बसेस नव्याने झालेल्या बोरगाव मंजू बायपास वरून परस्पर जात असल्याची तक्रार महाव्यवस्थापक (वाहतूक ) रा प मुंबई यांच्याकडे करण्यात आल्यानंतर विविध वृत्तपत्रातून वृत्त प्रकाशित करण्यात आले होते.

मात्र तरीही नागपूर / अमरावती प्रदेशातील चालक /वाहक जुमानत नसल्याने पत्रकारांनीच बायपास वर ठिय्या देत गणेशपेठ नागपूर आगराच्या बसेस महामार्गावर अडवून बोरगाव बस स्थानकात आणल्या व चालक वाहकांना समज दिली याबाबतचा एक व्हिडिओ नुकताच समाज माध्यमावर व्हायरल होत असून बोरगाव मंजुतील पत्रकारांचे सामान्य जनतेतून अभिनंदन होत आहे.

गेल्या कित्येक दिवसापासून जलद बसेस ह्या बोरगाव मंजू बस स्थानकात न येता परस्पर बाहेरून निघून जात असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे तसेच विद्यार्थ्यांची सुद्धा अडचण होत आहे.

महामार्गावर बसेस अडवून बसस्थानकात आणल्या

रा प अधिकारयांनी दखल घेण्याची मागणी

याबाबत स्थानिक रा प प्रशासनास माहिती देऊन कोणताही उपयोग झाला नसल्याने वरिष्ठांकडे तक्रारी सुद्धा करण्यात आल्या मात्र नागपूर प्रदेशातील चालक वाहक कोणत्याच बाबीला जुमानत नसल्याचे आढळून आले.

यावेळी बोरगाव मंजू प्रेस क्लबचे सुनील भाऊ सावळकर यांचे नेतृत्वात संजय तायडे ; संतोष गवई समाधान वानखडे; अमोल वाडेवाले ;सह पत्रकार मंडळींनी बायपास वर बसेस थांबून बस स्थानकापर्यंत आणल्या याबाबत रा.प. अधिकाऱ्यांनी दखल घेण्याची मागणी केली आहे.