ताज्या बातम्या राजकीय

बापटांच्या यातना वाढू नये हीच अपेक्षा – शरद पवार

पुणे : गिरीश बापट भाजपतर्फे निवडणूक प्रचारात उतरल्यामुळे विरोधक टीका करीत आहेत. यापार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील टीकास्त्र सोडले आहे. बापटांच्या यातना वाढू नये अशी अपेक्षा व्यक्त करत पवारांनी टोला लगावला आहे.

खासदार गिरीश बापट हे आजारी असतानाही भाजपने त्यांना पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरवल्याने भाजपवर चौफेर टीका होत आहे. तर भाजपने याचे समर्थन करताना देश प्रथम, मग पक्ष, शेवटी स्वतः अशा शब्दांत बापट यांचं कौतुक केले आहे.

यावर आता शरद पवार यांनी देखील भाष्य केले आहे. पवार म्हणाले, “त्यांना प्रचारात आणणं ही भाजपची गरज होती का? ठाऊक नाही. पण मी गिरीश बापट यांना भेटून आलो होतो, त्यांची प्रकृती पाहता त्यांच्या यातना वाढू नये हीच अपेक्षा आहे” बापट यांनी काल कसबा मतदार संघात भाजपच्या सभेला हजेरी लावली तसेच मतदारांना आवाहन करताना भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनाच बहुमतानं निवडून द्या असं आवाहनही केलं.