राजकीय

पवारांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला, अनंत गीतेचे हे विधान चुकीचे-रामदास आठवले.

मुंबई२२सप्टेंबर:-शिवसेना नेते आणि माजी खासदार अनंत गीते यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला, असे विधान करीत, शरद पवारांवर टीकास्त्र सोडले होते, त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी, शरद पवारांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना पंतप्रधान पदी विराजमान केले तर,याचे नुकसान काँग्रेसला होईल, असे पत्र शरद पवार तारिक अन्वर सहित,संगमा यांनी वरिष्ठांना लिहिले होते, त्यावरून शरद पवारांना काँग्रेस मधून काढले होते, त्यामुळे पवारांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रश्नच येत नाही, असं मत मुंबईत पत्रकारांसोबत स्पष्ट  करीत शरद पवारांची एकप्रकारे पाठराखण केली.शिवसेना आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यामध्ये ठाण्यात जो राडा झाला, हा संपूर्ण प्रकार चुकीचा असून, दोन्ही पक्षांंनी एकत्र येऊन काम करीत राज्याचा आणि मुंबईचा विकास साधावा असे आव्हान करीत,भाजपासेना युती साधण्यासाठीच हे सूतोवाच केल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात जे गुन्ह नोंदविण्यात आले आहेत,ते चुकीचे असल्याचे मत रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.माजी खासदार अनंत गीते यांनी शरद पवारांच्या विरोधात जे वक्तव्य केले ते चुकीचे असून,शरद पवार राज्याचे आणि  देशाचे नेते आहेत, त्यांचा सन्मान झाला पाहिजे,असे म्हणत शरद पवार यांच्यावर स्तुती सुमने उधळून, अनंत गीते यांच्या त्या वक्तव्याचे समर्थन केले नसल्याचे स्पष्ट होत आहे.