क्राईम ताज्या बातम्या

पत्नीच्या  दुःखाच्या विराहातून पोलीस अधिकाऱ्यांची आत्महत्या!

पुणे ३१ऑगस्ट:-एक महिन्यांपूर्वी झालेल्या पत्नीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे, पत्नीच्या दुःखाच्या विराहातून एका पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केल्या जात आहे. पुण्यातील पोलीसमोटार विभागात कार्यरत असलेल्या एका सहय्यक पोलीस उपनिरीक्षक दर्ज्याच्या अधिकाऱ्याने आपल्या राहत्या घरी गळपास लावून आपलं जीवन संपवलं असल्याची घटना, पुणे शहरातील हडसर भागातील हरपळे वसाहतीत घडली आहे.राजेश महाजन असे आत्महत्या केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचं नांव असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. याबाबत अधिक सविस्तर माहिती अशी आहे की,राजेश महाजन हे पोलिस खात्यात येण्यापूर्वी भारतीय लष्करात कार्यरत होते. लष्करातुन सेवा निवृत्तीनंतर,पोलिस खात्यात भरती झाले होते.दोन महिन्यांपूर्वी सर्व काही सुरळीत चालू होते. पण एक महिन्यांपूर्वी त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला, त्यापासून ते फारसे कोणाशी बोलत नव्हते, पत्नीच्या निधनानंतर ते पूर्णपणे खचून गेले होते, अशी माहिती समोर येत आहे. पत्नीच्या मृत्यूमुळे आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पत्नीच्या निधनानंतर त्यांच्या जीवनात नैराश्य आल्याने त्यांनी जीवन संपवलं असावं, असं मतं पोलिसांनी व्यक्त केले आहे. राजेश महाजन यांची आत्महत्येची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, तपासाला सुरुवात केली असून,मृतदेह पोस्मार्टम साठी पाठविण्यात आला आहे. घटनास्थळी आत्महत्या करण्याचं ठोस कारण काय आहे, असा कोणताही पुरावा आढळून आला नाही. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.