क्राईम

नागपूरातील वारांगना वस्तीत जमावबंदी लागू!

 

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठया प्रमाणात पोलीस ताफा तैनात!

नागपूर न्यूज डेस्क:-१२ऑगस्ट :-,देह व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या नागपुरातील गंगा जमुना परिसरात कोरोनाच्या नियमांचं सर्रासपणे उल्लंघन होत असल्याने, नागपुरातील या वारांगना वस्तीत११ऑगस्ट बुधवारपासून जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.तसेच याठिकाणी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये आणि परिस्थिती नियंत्रणात राहावी, म्हणून याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस ताफा तैनात करण्यात आला आहे.याठिकाणी गुन्हेगार पार्श्वभूमी असलेल्या लोकांचा मोठया प्रमाणात वावर असून, याठिकाणी अल्पवयीन मुलींकडून बळजबरीने देहविक्री करून घेत असल्याचे अनेक प्रकार समोर आले असून,याठिकाणी कोरोनाच्या संदर्भात लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन होत असून,या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना याठिकाणी होणाऱ्या प्रकारामुळे कमालीच्या त्रासाचा सामना करावा लागत असल्याने, याभागातील लोकप्रतिनिधींनी पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. त्याची दखल घेत,प्रशासनाला हा निर्णय घेणे भाग पडले आहे.पोलिसांनी हा भाग सील केला असून,याठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाची झाडाझडती घेण्यासाठी शेकडाभर पोलिसांची चमु याठिकाणी कर्तव्यावर ठेवण्यात आली आहे. तसेच याठिकाणी मद्य विक्री होऊ नये,त्यादृष्टीने याभागातील बिअर बार, वाईन शॉपचे परवाने रद्द करण्यासाठी पोलीस आयुक्त यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला लेखी पत्र देण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग आयुक्तांनी दिलेल्या पत्राची काय दखल घेते,हे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच गंगा जमुना वारांगना वस्तीत अनधिकृत बांधकाम सुद्धा जमीन दोस्त करण्यासाठी प्रशासन तयारी करीत आहेत.