क्राईम

दोन लाखाची लाच घेतांना रेल्वेचा अभियंता सीबीआयच्या ताब्यात!

कार्यलय अधीक्षकाने सुद्धा४० हजारांची लाच घेतल्याचे उघड!
भुसावळ न्यूज १७ऑगस्ट:-भुसावळ रेल्वे परिमंडळात विभागीय अभियंत्यांला दोन लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले आहे, या शिवाय याच विभागिय कार्यलयाच्या अधीक्षकाला सुद्धा ४०हजारांंची लाच घेतांंना सीबीआयच्या पथकाने अटक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोट परिमंडळातील कार्यरत असलेल्या विभागीय अभियंता एस.एल.गुप्ता याने एका कंत्रादाराकडून एका कामाची वर्क-ऑर्डर काढण्यासाठी २ लाख रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ अटक केली, तसेच वर्क ऑर्डरची फाईल मंजुरी साठी कार्यलय अधीक्षक संजीव रडे याने सुद्धा ४० हजार रुपये घेतल्याची धक्कादायक बाब सीबीआयच्या चमूने चव्हाट्यावर आणली आहे. भुसावळ रेल्वे विभागीय कार्यलयात कार्यरत असलेला विभागीय अभियंता एस.एल.गुप्ता आणि याच कार्यलयात अधीक्षक पदावर असलेला संजीव रडे यांनी एका कंत्राटदार या दोघांनी वर्क.ऑर्डर काढण्यासाठी २लाख अभियंत्यासाठी आणि ४०हजार रुपये संजीव रडे दयावे लागतील, अशी बोलणी झाली होती. कंत्राटदाराला ही रक्कम देण्याची मान्य नसल्याने, या प्रकाराची तक्रार दिल्ली येथील सीबीआय च्या कार्यलयात केली होती.त्यावरून दिल्ली येथील सीबीआय कार्यलयातील अधिकारी आणि कर्मचारी मिळून१८लोकांची चमु गेल्या आठदिवसापासून भुसावळ मध्ये तळ ठोकून होते.शेवटी१६ऑगस्ट सोमवारी१२वाजताच्या दरम्यान विभागिय अभियंता एस. एल.गुप्ताच्या कार्यलयात  लाचेची२लाख आणि४०हजार रुपयांची रक्कम घेतांंना विभागीय अभियंता गुप्ता आणि अधीक्षक संजीव रडे या दोघांच्याही मुसक्या,आवळण्यात सीबीआयच्यापथकाला यश आले. या दोनही लाचखोरांंना अटक केल्यानंतर दुपारी दीड वाजता दरम्यान एस. एल.अभियंता याच्या घराची झडती घेतली असता घरात५०लाख रुपयांची रोख रक्कम आढळून आली,ती रक्कम सुद्धा सीबीआयने जप्त केली आहे,सोबतच काही महत्त्वाचे दस्तऐवज सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे.ही कारवाई ज्यावेळी करण्यात आली, त्याच्या काही वेळातच भुसावळ रेल्वेच्या मंडळ कार्यलयात सर्व अधिकारी आणि इतर स्टाफ निघून गेल्याने,या कार्यलयात सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. या दोन्हीही लाचखोरांंना अटक करण्यात आली असून, या लाच प्रकरणात आणखी कोण कोण सहभागी आहेत, याचा शोध सीबीआय घेत आहे.