East-Freeway-to-Grant-Road-Elevated-Road
ताज्या बातम्या मुंबई

दक्षिण मुंबईतील वाहतूक सुलभ होणार !

साडेपाच किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचा पूल बांधणार, पूर्व मुक्तमार्ग ते ग्रँटरोड उन्नत मार्गाच्या उभारणीसाठी निविदा प्रक्रिया सुरु

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरळीत व्हावा या हेतूने मुंबई महापालिकेच्या वतीने तब्बल ५.५६ किलोमीटर लांबीचा पूल अर्थात उन्नत मार्ग मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार आहे. याबाबतची निविदा नुकतीच प्रकाशित झाली असून, निविदा प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात झाल्यापासून बांधकाम पूर्ण होण्यासाठी साधारणपणे ४२ महिन्यांचा कालावधी अंदाजित आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पूल खात्याद्वारे देण्यात आली आहे.

सदर प्रस्तावित उन्नत मार्ग हा दक्षिण मुंबईतील पी. डिमेलो मार्गावरील ऑरेंज गेट नजिक सुरु होणा-या पूर्व मुक्तमार्ग येथून प्रस्तावित करण्यात आला असून तो ग्रँट रोड स्टेशन परिसरापर्यंत असणार आहे. पूर्व मुक्त मार्ग ते ग्रँटरोड स्टेशन परिसर या सुमारे ५.५६ किलोमीटर लांबीच्या अंतरासाठी सध्या ३० मिनिटे ते ५० मिनिटे एवढा कालावधी लागतो. मात्र, भविष्यात हे अंतर कापण्यासाठी उन्नत-मार्ग मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाल्यानंतर तेवढ्याच अंतरासाठी केवळ ६ ते ७ मिनिटे लागणार आहे.

पूर्व मुक्तमार्गास जोडलेल्या पी. डिमेल्लो मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित उन्नत मार्ग (पूल) हा अत्यंत आवश्यक आहे. यामुळे दक्षिण मुंबईतील नागरिकांचा प्रवास अधिक सुखद होवून दक्षिण मुंबईतील विविध ठिकाणी उद्भवणा-या वाहतूक कोंडीपासून सुटका होण्यास मदत झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

प्रस्तावित उन्नत मार्गाच्या उभारणींनंतर पूर्व मुक्त मार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत होऊन प्रवासाचा कालावधी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच सागरी किनारी रस्त्याला पूर्व मुक्तमार्गाशी जोडण्यासाठीही हा मार्ग महत्वाचा दुवा ठरणार आहे. डॉ. बी. आर. आंबेडकर मार्ग, रफी अहमद किडवाई मार्ग, पोर्ट ट्रस्ट क्षेत्र, पी. डिमेलो रोड, पूर्व द्रुतगती महामार्ग (EEH), ग्रँट रोड परिसर, ताडदेव आणि मुंबई सेंट्रल या भागातील; म्हणजेच दक्षिण मुंबईतील वाहतूक अधिक सुरळीत, अधिक सुलभ व अधिक वेगवान करण्याच्या दृष्टीने हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेला रुपये ६६२.४२ कोटी इतका खर्च अंदाजित आहे, अशीही माहिती पूल खात्याद्वारे देण्यात आली आहे.