अकोला

तेल्हारा तहसील कार्यालयातील लिपिकाची लाच प्रकरणात पोलीस कोठडीत रवानगी

अकोट : अकोला येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश सुनील पाटील यांनी अप. क्र.७३/२०२३ कलम ७ भ्रष्टाचार अधिनियम ८८ मधील आरोपी वैभव फुलचंद जोहरे वय वर्षे २९ तहसील कार्यालया तेल्हारा येथील महसूल सहाय्यक याने रेती व्यावसायिकास तीस हजार रुपये लाच मागणी केल्याचा आरोपात त्याची दि.१८. मार्च २०२३ पर्यंत लाच प्रतिबंधक विभाग अकोल्याचे पोलीस कोठडी मध्ये केली आहे.

या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी आहे की, तेल्हारा येथील एक २४ वर्षीय युवक रेती वाहून नेण्याचा व्यवसाय करत होता. तो व्यवसाय सुरळीत चालविण्याकरिता तेल्हारा तहसील कार्यालयातील वैभव जोहरे या लिपिकाने व्यवसायिकाकडे तीस हजार रुपये लाच मागणी केली. त्यावर व्यावसायिकाने लाच प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यांच्या पडताळणीमध्ये जोहरे यांनी लाच मागितल्याचे सिद्ध झाले.

आरोपी वैभव जोहरे यास दि.१७ मार्च २०२३ चे रात्री अटक केली. त्यानंतर विद्यमान कोर्टासमोर वरील आरोपीला हजर केले. या प्रकरणात सरकारतर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी व्युक्तिवाद केला कि, आरोपी हा महसूल कार्यालय तेल्हारा येथे लोकसेवक आहे. या प्रकरणातील तेल्हारा येथील फिर्यादी याला रेतीची वाहतूक ट्रॅक्टर मधून करण्याकरिता तीस हजार रुपयाची लाचेची मागणी केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे.

तसेच या प्रकरणात आणखी इतर कोणाचा सहभाग आहे काय याबाबत सखोल तपास करणे बाकी आहे. त्यामुळे वरील प्रकरणात आरोपीतास पोलीस कठोडी मध्ये ठेवण्याचा आदेश करण्यात यावा. अशी विनंती सरकार तर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी केली.